आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव Chronology: ईदच्या 2 दिवसांपूर्वी झाला होता हल्ला, त्याचवेळी गुजरामध्ये स्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्याच दिवशी गुजरातच्या मोडासा येथेही स्फोट झाला. - Divya Marathi
त्याच दिवशी गुजरातच्या मोडासा येथेही स्फोट झाला.
औरंगाबाद - 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरले. हा बॉम्बस्फोट रमजान ईदच्या 2 दिवसांपूर्वी घडवण्यात आला होता. बॉम्बस्फोटात 8 जणांचा मृत्यू आणि जवळपास 100 जण जखमी झाल्याची नोंद आहे. ज्या दिवशी मालेगावात बॉम्बस्फोट घडला, त्याच दिवशी आणि त्याच वेळी गुजरातच्या मोडासा येथे सुद्धा बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये एका 15 वर्षीय मुलाच्या मृत्यूची नोंद आहे. 
 
 
घटनास्थळी धडकला होता हजारोंचा जमाव
- रमजान ईदला अवघे 2 दिवस बाकी असताना मालेगावात दुहेरी स्फोट घडला होता. ईदच्या उत्सवावर विर्जन टाकण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला असा आरोप स्थानिकांनी केला. तसेच घटनास्थळी आलेल्या पोलिसांवर दगडफेक सुद्धा केली. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला.
- सुरुवातीला हा स्फोट नेमका कसा झाला यावर संभ्रमावस्था होती. पोलिसांनी हा स्फोट गॅस सिलेंडरचा असल्याचा प्राथमिक निष्कर्श काढला होता. 
- 29 सप्टेंबर 2008 रोजी संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर मालेगावात दंगल उसळली होती. त्यावेळी परिसरात एसआरपीएफच्या बटालियन्सला तैनात करून परिस्थिती आटोक्यात आली. 
- मालेगावात स्फोट झाला, त्याचवेळी गुजरातच्या मोडासा शहरातही रमजानच्या बाजारपेठेत स्फोट घडून आला. मालेगावात 8 तर मोडासा येथे एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली. 
 

बाइकमध्ये लावून रिमोटने घडवला स्फोट
बॉम्बस्फोट मोटरसायकलमध्ये लावून रिमोटने घडवण्यात आले होते. दोन्ही बॉम्बस्फोट कमी तीव्रतेचे होते. बॉम्बस्फोटांची जागा प्रतिबंधित संघटना सिमीच्या जुन्या बंद पडलेल्या कार्यालयासमोरची होती. गुजरातचा बॉम्बस्फोट आणि मालेगावचा बॉम्बस्फोट हे दोन्ही ठिकाणी मुस्लिम लोकवस्ती असलेल्या ठिकाणी झाले होते. दोन्ही बॉम्बस्फोटांच्या तंत्रज्ञानात साम्य दिसून आले होते. 
 

तपासात काय समोर आले?
- गुजरात बॉम्बस्फोटाचा तपास NIA ने गुंडाळला आहे. तर महाराष्ट्रात या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत मुस्लिम दहशतवादी संघटनांची नावे घेण्यात आली. त्यामध्ये अनेक संशयितांना अटकही झाली. मात्र, महाराष्ट्र एटीएसने या बॉम्बस्फोटात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले. 
- महाराष्ट्र एटीएसच्या आरोपानंतरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, शिव नारायण गोपाल सिंह कंलसंघरा आणि श्याम भवरलाल साहू या तीन संशयितांना अटक करण्यात आली. साध्वींच्या बचावासाठी उमा भारती यांच्यासह अनेक राजकीय नेते आले होते. - शिवसेनेच्या मुखपत्राने तर या संदर्भात अग्रलेख लिहून साध्वींना राजकीय कटातून पकडण्यात आल्याचा दावा केला होता. बचाव करणाऱ्या इतर नेत्यांमध्ये भाजपचे तत्कालीन प्रवक्ते प्रकाश जावडेकर, योगी आदित्यनाथ यांचाही समावेश होता. 
- या अटकेच्या काही दिवसांतच महाराष्ट्र एटीएसने लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांच्या विरोधात मकोका लावण्यात आला. 
- 9 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित या दोघांच्या विरोधातील मकोका एनआयएकडून काढण्यात आला. तसेच एप्रिलमध्ये एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीनचिट दिली. तर, कर्नल पुरोहितला सोमवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला.
बातम्या आणखी आहेत...