आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात आतापर्यंत २१ टक्के पेरणी पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मृगनक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने औरंगाबाद विभागात २० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. लातूर विभागात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे केवळ टक्का क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली.
दहा दिवसांपासून कमीअधिक फरकाने दररोज पाऊस पडत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १३६.५ मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात १०४ मिमी पाऊस झाला. उर्वरित सहा जिल्ह्यांत कमी पर्जन्यामान झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत ते दुपटीने जास्त आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे ४३ लाख ९४ हजार हेक्टर सरासरीपैकी लाख ९४ हजार ६४७ हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लाख ३५ हजार हेक्टर (४६.४२ टक्के) क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. जालना २४.९९ टक्के, बीड २५, लातूर विभागत कमी पाऊस झाल्याने लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यांत नाममात्र हजार १०० हेक्टरवर कपाशी लागवड करण्यात आली आहे. गतवर्षी मूग, उडीदचे क्षेत्र अत्यल्प होते. यंदा मूग ९, उडीद ६, सोयाबीन २६, तूर १०, बाजरी ३, तर ज्वारीची टक्के क्षेत्रावर लागवड झाली असल्याचे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विभागीय सांख्यिकी अधिकारी एच. बी. झनझन यांनी सांगितले.
खरिपाची पेरणी १५ जुलैपर्यंत पूर्ण झाल्यास उत्पादन भरघोस येते. पण त्यानंतर पेरणी लांबत जाईल तसतशी उत्पादनात घट येईल. खंडाने विषमतेने पाऊस पडला तर त्यामध्ये आणखी घट येऊ शकते. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. उतारास आडवे चर पाडून जलपुनर्भरणावर भर द्यावा. पावसाने मोठा खंड दिल्यास उपलब्ध पाण्याचा सिंचनाद्वारे मोजून मापून वापर करून पिके जगवावीत. रासायनिक सेंद्रिय खताचा समतोल वापर करा. हवामानानुसार पिकांचे नियोजन करावे.
बातम्या आणखी आहेत...