आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौकातील ध्वजारोहणाची रंगीत तालीम, दौलताबाद किल्ल्याच्या चांदमिनारइतकी स्तंभाची उंची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रांती चौकातील हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून येथे उभारलेल्या ध्वजस्तंभावर बुधवारी ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेण्यात आली. शनिवारी (४ नोव्हेंबर) राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकीय ध्वजारोहणाचा सोहळा होणार आहे. 

३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ कोल्हापुरात 
कोल्हापुरातील पोलिस उद्यानात ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभावर ९० फूट लांब, ६० फूट रुंद असा हजार ४०० चौरस फुटांचा ध्वज यंदा महाराष्ट्रदिनी फडकवला. वाघा बॉर्डरनंतर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वज आहे. 
 
हुतात्मा स्मारकाचे वैशिष्टये
- ६५०० चौरसफूट क्षेत्रफळावर उभारण्यात आले आहे हुतात्मा स्मारक. 
- २१० फूट उंचीचा आहे हा ध्वजस्तंभ. दौलताबाद किल्ल्याच्या चांदमिनारइतकी आहे स्तंभाची उंची. 
- २.५ कोटीरुपये एकूण स्मारक उभारणीचा खर्च. 
- २०१५ मध्ये ध्वजस्तंभ उभारणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. 
- १८५७ च्या उठावातील वीर सैनिक मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारले आहे. 
बातम्या आणखी आहेत...