आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जलयुक्त शिवार'मध्ये २२३ गावांची केली निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औंरगाबाद - जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील २२३ गावे निवडण्यात आली असून सर्वाधिक ३७ गावे वैजापूर तालुक्यातील, तर सर्वात कमी गावे खुलताबाद तालुक्यातील आहेत. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तालुकानिहाय गावाची संख्या ठरवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत तालुक्यातील गावेदेखील निवडण्यात येणार आहेत. जलुयक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यात गावाची संख्या ठरवण्यात आली आहे. मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत गावांची संख्या कमी ठरवण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या गावातील संख्या निश्चितीवरदेखील झाला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २३२ गावे निवडण्यात आली होती.

औरंगाबाद तालुका : २५ गावे
राज्यातसर्वांसाठी पाणी हे ब्रीद घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील गावांची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार कृषी, सिंचन, रोहयो यांसह सर्व विभागांच्या माध्यमातून जलयुक्त शिवारची कामे करण्यात येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत गावांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यातील २५ गावे, वैजापूर ३७, गंगापूर-२९, खुलताबाद-१०, सिल्लोड-३२, फुलंब्री-१६, कन्नड-२९, पैठण-३० आणि सोयगाव तालुक्यातील १४ गावांचा समावेश करण्यात आला आहे.