आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - कुख्यात गुन्हेगार राम बोडखेने तीन साथीदारांच्या मदतीने संजयनगर भागातील एका 24 वर्षीय युवतीवर बलात्कार केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे सामूहिक बलात्कार टाळल्या गेला. पोलिसांनी बोडखेसह चौघांना अटक केली आहे. नागरिकांच्या मारहाणीत जखमी बोडखेला घाटीत दाखल करण्यात आले आहे.
पीडित युवतीची थोरली बहीण, मेव्हणा आणि तीन भावंडांसह संजयनगर, बायजीपुरा गल्ली क्र. सी-11 मध्ये राहते. तिचे तिन्ही भाऊ मजुरी करतात. रात्री दोन भाऊ घरी आल्यानंतर तिसर्या भावाची वाट पाहत ती रात्री 11.30 च्या सुमारास घरासमोर उभी होती. त्या वेळी बसैयेनगर येथील मोकळ्या मैदानात बुलेटवर (एमएफएन-4045) मद्यधुंद अवस्थेत बोडखे आणि होंडा अँक्टिव्हा दुचाकीवर (एमएच-20-एएच-1860) त्याचे साथीदार प्रतीक चंचलानी, संदीप सरकटे, अनिल खाजेकर आले. त्यानंतर बोडखे संजयनगरात आला. तेथे उभ्या असलेल्या युवतीला उचलून तिचे तोंड दाबत तिला बसैयेनगरातील मोकळ्या मैदानाजवळ आणले. मैदानात जाण्यासाठी पाच फुटांच्या भिंतीवरून उडी मारावी लागते. मैदानाजवळ उभ्या असलेल्या बोडखेच्या साथीदारांनी तिला भिंतीवरून खाली उतरवले.
याच्यानंतर तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. बोडखेसह त्याच्या साथीदारांनी संबंधित युवतीला मैदानातील जिमच्या पाठीमागे नेले. तेथे बोडखेने तिच्यावर बलात्कार केला. हा घृणास्पद प्रकार पाहणार्या काही नागरिकांनी बोडखेला पकडले आणि बेदम चोप दिला. मात्र, त्याचे तिन्ही साथीदार पसार झाले. हा प्रकार पाहून अँड. महेश सोनवणे यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले. जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ बोडखेला पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडवत घाटीत दाखल केले. मारहाणीत त्याच्या डोक्याला आठ टाके पडले. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पहाटे 3.10 च्या सुमारास जिन्सी पोलिस ठाण्यात बोडखे, प्रतीक चंचलानी, संदीप सरकटे आणि अनिल खाजेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
चंचलानी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता - प्रतीक चंचलानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. तो घाटीच्या अभ्यागत कक्षाचा सदस्य होता. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या शहरातील निकटवर्तीय कार्यकर्त्याशी चंचलानीची जवळीक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मानसी देशपांडे खून प्रकरणात नाव - राज्यभर गाजलेल्या मानसी देशपांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी जावेद खान ऊर्फ टिंगर्या हबीब खान याला बोडखेने आर्शय दिला होता. बोडखे याच्याविरुद्ध अनेक गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असून त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.