आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातून २३०० ब्रास वाळू जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महसूलविभागाच्या भरारी पथकाने तीन दिवसांत २३०० ब्रास वाळू जप्त केली आहे. नदीपात्रातून होणारा वाळूचा बेकायदा उपसा आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी भरारी पथके स्थापन केली आहेत. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पथके स्थापन केली. तहसील विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत ही वाळू जप्त करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत टाकण्यात आलेल्या छाप्यात २३०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. गुरुवारी ३५० ब्रास, शुक्रवारी ४५९ ब्रास, शनिवारी १६४५ ब्रास अशी एकूण २३०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तसेच अवैध वाळूसाठा करणाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, तालुका आणि गावस्तरावील पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत.
अचानक भेटी देणार
नदीपात्रातून वाळूचा बेकायदा उपसा आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकावर उपविभागीय अधिकाऱ्याकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकाकडून होणाऱ्या कारवाईची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारीही अचानक भेटी देणार आहेत.