आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांच्या ठेकेदारांना दिली चोवीस तासांची डेडलाइन, महापौरांचे फर्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वर्षभरापूर्वी कार्यादेश मिळूनही रस्त्यांची कामे सुरू करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध महापौर त्र्यंबक तुपे यांनी आक्रमक पवित्रा घेतला अाहे. २४ तासांत कामे सुरू केली नाहीत तर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असे फर्मान त्यांनी आयुक्तांना दिले. दुसरीकडे पूर्वी केलेल्या कामांपोटी सुमारे ८० कोटी महापालिकेकडे थकले असून त्यातील निम्मी रक्कम मिळाली तरच कामे करता येणे शक्य असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे असून १३ जूनला सायंकाळी सात वाजता महापालिकेचे कामकाज थांबले त्या वेळी तिजोरीत जेमतेम साडेसहा कोटी रुपये उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.

रखडलेल्या रस्ता कामांची बैठक सोमवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुमारे १२५ रस्त्यांच्या कामासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात कामे सुरूच झालेली नाहीत. आझाद चौक ते कटकट गेट, रोशन गेट, आझाद चौक, एमजीएम चौक ते चिश्तिया चौक, सेव्हन हिल्स ते सेंट्रल नाका आदी प्रचंड वर्दळीचे रस्ते आहेत. ही कामे का रखडली याबद्दल महापौरांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे पाहून महापौरांनी काळ्या यादीत ठेकेदारांना टाकण्याचे फर्मान काढले. काम करायचे नसेल तर अल्प मुदतीच्या निविदा काढून नव्या ठेकेदारांना कामे देऊ, या दोन दिवसांपूर्वीच्या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पुढे वाचा...
>आदेशानंतर यादी
>आयुक्त का नव्हते ?
>यांची होती उपस्थिती