आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरगड्यांना चाकूचा धाक दाखवून २४ लाख लुटले, गोलवाडी शिवारात धाडसी दरोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाच सशस्त्र दरोडेखोरांनी वाॅचमन आणि स्वयंपाक्याला चाकूचा धाक दाखवून गोलवाडी शिवारातील प्रवीण लक्ष्मीकांत तुलसीयान यांच्या बंगल्यावर २४ लाख रुपयांची लूट केली. ही घटना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी २० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये रोख असा ऐवज लांबवला.
दोन दिवसांपूर्वी तुलसीयान कुटुंबीयांसह मुंबईला गेले आहेत. घराची सर्व जबाबदारी दोन वॉचमन आणि स्वयंपाकी यांच्यावर टाकली होती. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास कुत्रे भुंकण्याचा आवाज आला म्हणून वॉचमन गेटजवळ गेला असता पाच दरोडेखोरांनी त्याच्या गळ्याला चाकू लावला आणि स्टाफ रूममध्ये कोंडले. त्यानंतर स्वयंपाकघरात घुसले. स्वयंपाकी राजकुमार रॉय यालादेखील चाकूचा धाक दाखवत स्टाफरूममध्ये बंद केले आणि बेडरूमधील कपाट तोडून चार लाख रुपये रोख आणि २० लाख रुपयांचे दागिने लांबवले. चांदीच्या भांड्यांना मात्र दरोडेखोरांनी हात लावला नाही. रविवारी सकाळी तुलसीयान यांचे शेजारी बजाज यांनी तुलसीयान यांचे नातेवाईक गिरीधर संगानेरिया यांना घटनेची माहिती दिली. गिरीधर तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी लगेच सातारा पोलिसांना कळवले. संगानेरिया यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
बातम्या आणखी आहेत...