आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 246 Candidate In Mukund Nagar For Corporation Election

मुकुंदवाडीत तिरंगी लढत; बंडखोरी कायम, मतदारांची संख्या हजार २४६

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी वॉर्ड क्रमांक ८३ मधून भाजपने अंबिकानगरच्या विद्यमान नगरसेविका कमल नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या सुषमा वानखेडे यांचे त्यांना आव्हान आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नसली तरी दीपाली बरकशे भाजपने उमेदवारी नाकारलेल्या सीमा नांदरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल करून दोन्ही पक्षांना आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्येच खरी लढत होणार आहे; पण अपक्ष उमेदवारही तुल्यबळ असल्याचे बोलले जात आहे.
आमदार नारायण कुचे प्रथम २००५ मध्ये अंबिकानगर २०१० मध्ये मुकुंदवाडी मधून निवडून आले होते. या निवडणुकीत ओबीसी महिला प्रवर्गासाठी हा वॉर्ड राखीव आहे. भाजपच्या उमेदवार नरोटेंना निवडून आणण्यासाठी आमदाराला आपली शक्ती पणाला लावावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. कारण काँग्रेसच्या उमेदवार वानखेडेही तेवढ्याच ताकदीच्या आहेत. त्यात युतीतून बाहेर पडलेल्या दोन बंडखोरांनी आव्हान असल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

स्थानिकांचा विरोध

नरोटेअंबिकानगरच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांचा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांना मुकुंदवाडी वॉर्डातून पक्षाने उमेदवारी दिली. हे काही स्थानिक कार्यकर्त्यांना आवडलेले नाही. दुसरीकडे दोन्ही अपक्ष स्थानिक उमेदवार आहेत. अपक्ष दीपाली बरकश, अपक्ष सीमा नांदरकर, काँग्रेस सुषमा वानखेडे, भाजप कमलन रोटे