आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Crore For The Incubation Center In Bamu University

"इन्क्युबेशन सेंटर'साठी २५ कोटी, कुलगुरूंनी दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उद्योग जगताशी चांगला संवाद ठेवून त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी संकलित करण्याचे काम सुरू आहे. इन्क्युबिशन सेंटर उभारण्यासाठी २५ कोटी देण्याचे राहुल बजाज यांनी मान्य केले आहे. आपण जागेची पाहणी केली असून ऑनलाइन टेंडरही बोलवण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. शिवाय गरवारे रिसर्च सेंटरचा प्रस्तावही देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. २९ ३० ऑक्टोबरदरम्यान युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री इंटरअॅक्शन समीटच्या निमित्ताने सोमवारी (१९ ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज् अँड अॅग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी किमान दोन ‘समीट’ घेण्यात येतील आपल्या कार्यकाळात कुठल्याही परिस्थितीत एक हजार कोटी रुपयांचा निधी सीएसआरअंतर्गत आणणार अाहे, दोन दिवसीय ‘समीट’ दरम्यान अनेक सामंजस्य करार होणार असल्याचेही कुलगुरुंनी सांगितले. सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे म्हणाले, समीटमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी उद्योगांनी नावनोंदणी केली नसली तरी अखेरच्या चार दिवसांत संख्या वाढेल. दिवाळसणामुळे उद्योगपती व्यग्र आहेत, सध्या प्रतिसाद कमी असल्याचे जाणवते, पण उद्योगपती सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी अध्यक्ष प्रा. मुनीष शर्मा म्हणाले, आपण या दिशेने सुरुवात केली आहे. इतक्या लवकर यश येईल असे नाही, ही खूप मोठी प्रक्रिया आहे. विद्यार्थी हाच उद्योग आणि विद्यापीठ यातील दुवा होईल, असेही त्यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाठ, सीएमआयएचे अध्यक्ष अाशिष गर्दे, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, एमआयटीचे महासंचालक डॉ. मुनीष शर्मा, उद्योगती मिलिंद पाटील, ओएसडी निवृत्ती गजभरे गिरीष काळे यांची उपस्थिती होती.
बजाजचा पुढाकार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्योजकांचा सत्कार
‘डिजिटलइंडिया, मेक इंडिया, स्किल इंडिया, क्लीन इंडिया’ यासह विविध विषयांवर विचारमंथन होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गरवारे उद्योग समूहाचे अध्यक्ष शशिकांत गरवारे, बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज, व्हिडिओकॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वेणुगोपाल धूत, वोक्हार्टचे अध्यक्ष डॉ. हबील खोराकीवाला आणि नाथ सीड्सचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कागलीवाल आदींचा गौरव करण्यात येणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी परिषदेचा समारोप होईल.