आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळमध्‍ये झालेल्या ट्रक-बस अपघातात 25 जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ - सोलापूर-धुळे महामार्गावरील वेरूळ घाटात ट्रक व बसमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत 25 जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
बुधवारी सिंदखेडहून औरंगाबादकडे येणारी बस (एमएच 20 बीएल 0959) व खुलताबादहून वेरूळच्या दिशेने निघालेला ट्रक (एमएच 23-5683) चुकीच्या दिशेने आल्याने दोन्ही वाहनांत समोरासमोर धडक झाली. यात 25 जण जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ खुलताबाद येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी तीन जणांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले.
या अपघातात भालचंद्र अरविंद देवरे (36, बसचालक, सिंदखेड), अरुण दयाराम पाटील (28, बसवाहक, सिंदखेड) हिरालाल नामदेव ठाकूर (50, औरंगाबाद), सतीश सुधाकर कुलकर्णी (42, औरंगाबाद), कलाबाई दादाराव मोरे (60, विरमगाव), दादाराव मोरे (65, विरमगाव), अरुण त्र्यंबक वाणी (40, चाळीसगाव), सखुबाई काशीनाथ राठोड (35, औरंगाबाद), सुषमा महावीर मुळे (35,वेरुळ) सुरेश मच्छिंद्र मोरे (20, कन्नड), विष्णू गायकवाड (20, वडोदबाजार) उमेश बेगम (40, कन्नड) गणेश गवळी (65, फुलशिवरा) सुमन गवळी (फुलशिवरा ) हे जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वेरूळ व खुलताबाद येथून वाहतूक बंद करत अपघातग्रस्त वाहनांना पोलिसांनी रस्त्यातून बाजूला केले. त्यानंतर साधारणत: तासाभराने वाहतूक पूर्ववत झाली.