आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Thousand Employees For Lok Sabha Election, Latest News In Divay Marathi

लोकसभा निवडणुकीसाठी 25 हजारांवर कर्मचारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात 17 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता बुधवारपासून (5 मार्च) लागू झाली. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली. मागील लोकसभा निवडणुकीत नगर व शिर्डी मतदारसंघासाठी 22 हजार कर्मचारी व अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. यंदा महसूल, भूसंपादन, मुद्रांक, पुरवठा विभाग, जिल्हा परिषदेचे शिक्षक असे 25 हजारांवर कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 मार्च आहे. अर्जांची छाननी 27 मार्चला होईल. 29 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 17 एप्रिलला मतदान व 16 मे रोजी मतमोजणी होणार आहे. नगरसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी बारा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. शेवगावसाठी ज्योती कावरे (प्रांताधिकारी, पाथर्डी), राहुरीसाठी कुंदन सोनवणे (उपजिल्हाधिकारी पुनर्वसन), पारनेरसाठी संतोष भोर (प्रांत, र्शीगोंदे), र्शीगोंद्यासाठी बी. एन. सैंदाणे (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन), कर्जत, जामखेडसाठी संदीप कोकडे (प्रांत, र्शीगोंदे) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
शिर्डी मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोल्यात डी. ए. कर्डक (उपजिल्हाधिकारी, रोहयो), संगमनेरसाठी संदीप निचित (प्रांताधिकारी, संगमनेर), शिर्डीत अजय मोरे (प्रांताधिकारी, शिर्डी), कोपरगावसाठी प्रवीण देवरे (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन), र्शीरामपूरसाठी प्रकाश थवील (प्रांताधिकारी, र्शीरामपूर), नेवाशासाठी रवींद्र ठाकरे (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन) या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यात महसूल व पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे.
उमेदवारांच्या खर्चाची र्मयादा 70 लाखांपर्यंत करण्यात आली असून, तीन टप्प्यांत निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांना मतदारयादीत नाव नोंदवता येईल. ओळखपत्रापेक्षा मतदारयादीत नाव असणे महत्त्वाचे आहे.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे विनापरवानगी खासगी व सार्वजनिक जागांवर पोस्टर लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह किंवा कापडी फलक लावणे, झेंडे लावणे यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या जागेवर फलक, पोस्टर लावण्यात आले आहेत, त्यांनी ती तातडीने हटवावीत; अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कवडे यांनी दिला.