आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजिस्ट्री कार्यालयात दररोज 25 व्यवहार, नोटबंदीमुळे 27 दिवसांनंतरही तुरळक व्यवहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीला २७ दिवस उलटले तरीही रजिस्ट्री कार्यालयाला बसलेला या निर्णयाचा फटका कायम आहे. यापूर्वी शहरात १२५ पेक्षा अधिक रजिस्ट्री होत होत्या. सध्या ही संख्या केवळ २० ते २५ इतकीच आहे.
औरंगाबाद जिल्ह्याला ३६१ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी १६१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. दरम्यान, स्टॅम्प ड्यूटी भरल्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांना रजिस्ट्री कार्यालयाने नोटिसा दिल्या असून त्याबाबतची माहिती मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोटाबंदीनंतर २७ दिवस होत आले तरी रजिस्ट्री कार्यालयातील व्यवहारांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही.

शहरातल्या पाचही ठिकाणी यापूर्वी किमान २५ व्यवहार याप्रमाणे १२५ व्यवहार होत होते. मात्र आता ही संख्या केवळ पाच इतकी असून पाचही ठिकाणी साधारण एकूण २५ व्यवहार होत आहेत. यातही मोठ्या व्यवहाराऐवजी केवळ भाडे करारनामा यासारखेच व्यवहार होत आहेत.
विभागात २५१ कोटींची वसुली

औरंगाबादविभागात औरंगाबाद, बीड आणि जालना हे तीन जिल्हे येतात. या तीन जिल्ह्यांना ४९६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २५१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. यामध्ये औरंगाबादमधून १६१ कोटी ५१ लाख, तर बीड जिल्ह्यातून ५३ कोटी ९४ लाख आणि जालना जिल्ह्यात ३५ कोटी ८० लाख इतकी वसुली झाली आहे. हे प्रमाण वसुलीच्या ५०.६५ टक्के आहे.

व्यावसायिकांना फटका
रजिस्ट्रीकार्यालयांच्या परिसरात अनेक किरकोळ व्यावसायिक झेरॉक्स, लॅमिनेशन अशा सेवा देतात. परंतु, नोटबंदीनंतर रजिस्ट्री कार्यालयातील व्यवहार थंडावल्याने या व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. सुट्या पैशांची चणचण अन् कमी झालेली ग्राहकी अशा दुहेरी संकटांचा या व्यावसायिकांना सामना करावा लागत आहे.

स्टॅम्प ड्यूटीसाठी या कार्यालयांना नोटिसा
सरकारी कार्यालयाकडून स्टॅम्प ड्यूटी भरली जाते, त्याची माहिती मागवण्यात आली आहे. सर्व सरकारी कार्यालयांना मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात सार्वजनिक बांधकाम खाते, महापालिका, एमटीडीसी, आरोग्य, नगरपालिका, आरोग्य, जलसंपदा यासह इतर विभागांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया तसेच इतर प्रकरणांत स्टॅम्प ड्यूटी भरल्याचे विवरण मागवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...