आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 रणरागिणी यंदा प्रथमच बाप्पांसमोर देणार ढोलवर थाप, एकत्र येत स्थापन केले गणेश मंडळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाज नगरातील२५ रणरागिणींनी एकत्र येऊन गणेश मंडळाची स्थापना केली. ढोलपथक स्थापन करून त्यांनी सरावही सुरू केला आहे. या कामगार वसाहतीतील हे एकमेव महिलांचे ढोलपथक असून दररोज तीन तासांवर त्यांचा सराव सुरू आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी आम्ही एकत्र आल्याचे मंडळाच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 
 
कामगार वसाहतीतील जय भवानी चौकात २५ महिलांनी एकत्र येऊन रणरागिणी गणेश मंडळाची स्थापना केली आहे. मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे. या मंडळात शाळकरी मुलींपासून महाविद्यालयीन तरुणी कामगार महिलांचा समावेश आहे. मात्र, सर्वांना निर्णय घेण्याचा सारखाच अधिकार असल्याचे मंडळाच्या सचिव मेघा पाटील सांगतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज २५ महिलांना आम्ही एकत्र आणू शकलो. उद्या त्यात वाढ करून त्या २५० व्हाव्यात, असा प्रयत्न असल्याचे उपाध्यक्षा आशा महाले रोशनी चव्हाण यांनी स्पष्ट केले. 
 
रोज तीन तास सराव 
परंपरागत गणेशोत्सवाला फाटा देत महिलांनी ढोलवर थाप देण्यास प्राधान्य दिले आहे. या सर्व रणरागिणी रोज सायंकाळी ते दरम्यान ढोल वाजवण्याचा सराव करीत आहेत. शिस्तबद्ध रीतीने ताल-लय सांभाळून हा सराव केला जात आहे. राम पाटोळे, सतीश हिवाळे, प्रवीण आढे, सुमीत शिंदे हे मार्गदर्शन करत आहेत. मंडळाच्या सदस्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूकही काढण्यात येणार आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...