आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला आले अन् कामगार सेनेत गेले; 25 पदाधिकाऱ्यांचा भारतीय कामगार सेनेत प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नसमारंभासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेत शीलरत्न साळवे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. - Divya Marathi
लग्नसमारंभासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेत शीलरत्न साळवे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
आैरंगाबाद- फुलंब्री, भोकरदन, पिशोर सिल्लोड येथील वीज वितरण कंपनीमधील कर्मचारी एका लग्न समारंभासाठी सिल्लोड येथे एकत्रित जमले होते. भारतीय कामगार सेनेचे राज्य सचिव शीलरत्न साळवे यांच्याशी सर्व कर्मचाऱ्यांची समारंभात भेट झाली. येथेच विविध समस्या आणि मागण्यांवर त्यांच्यात चर्चा झाली. 

वीज कामगार महासंघाच्या २५ कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे साळवे यांच्याकडे मांडले. कर्मचारीच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तत्काळ सूचना केल्यानंतर संबंधित २५ पदाधिकाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला. याप्रसंगी गणेश आहेर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी त्यांनी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे यापुढेही एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार केला. 
बातम्या आणखी आहेत...