आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या दोनशे उंबऱ्यांच्या फुलशिवऱ्यात 25 तरुण पोलिस दलात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- दोन वर्षांत गंगापूर तालुक्यातील गाजगाव, वसुसायगावसह फुलशिवऱ्यातील ५० मुले पोलिस दलात भरती झाली आहेत. त्यात एकट्या फुलशिवऱ्यातील २५ मुलांचा समावेश आहे. ही किमया आहे मुलांचे स्वयंशासन, स्वयंमार्गदर्शन बी.एम.गर्जे या राष्ट्रीय अॅथलेटिक्सचे मैदानी खेळांसाठी मुलांना मोलाचे मार्गदर्शन होय. एकाच गावातील २५ मुले पोलिस दलात भरती झाल्याने आता दोनशे उंबऱ्यांचे फुलशेवरा हे गाव पोलिसांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच ग्रामीण भागातील गंगापूर तालुक्यातील पाच गावांच्या सुमारे ५० युवकांना पोलिस दलात स्थान मिळाले आहे. सन २०१५-१६ या वर्षात तरुणांनी कठोर मेहनत करत राज्यातील स्पर्धकांना मागे टाकत यशाला गवसणी घातली. सतत दोन वर्षे पोलिस भरतीची वाट पाहता युवकांनी मैदानावर घाम गाळला. तंत्रशुद्ध सराव, कठोर मेहनत अभ्यासामुळे या युवकांना हे यश मिळाल्याचे गर्जे यांनी सांगितले. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलिस भरतीबाबत निवडलेल्या धोरणामुळे सध्या भरती प्रक्रिया पारदर्शकरीत्या पार पडत असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील मुले आता सहज पोलिस दलात भरती होत असल्याचे चित्र आहे.
अत्यंत गरीब परिस्थिती राहायला घर नाही, अंगात फाटके कपडे, दोन वेळच्या जेवणाचे त्रांगडे परंतु सहकाऱ्यांचे पाहून आपणही आपल्या शरीराच्या मेहनतीच्या जोरावर पोलिस दलात भरती व्हावे अशी परिसरातील अनेक तरुणांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला गर्जेंनी बळ देत पायाला दुखापत झालेली असताना त्यातून सावरून दररोज वसुसायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सराव करत असत. यात धावणे, गोळाफेक, उंच, लांब उडी आदी विविध खेळांचा समावेश होता. सरावादरम्यान त्यांना मुलांनाही सरावात सहभागी करून पोलिस दलात निवडीसाठीच्या टिप्स दिल्या. त्यासाठी मुलांची जिद्द सर्वात महत्त्वाची ठरली. २०१५ १०१६ या दोन वर्षांत परिसरातील गावाची ५० वर मुले पोलिस दलात भरती झाली. यात काही औरंगाबाद शहर, ग्रामीण,मुंबई, रायगड भारतीय सैन्य दलात भरती झाले आहेत. गर्जे यांच्यासोबत आजही तरुण हे पोलिस भरतीतील परीक्षेसाठी मैदानी खेळांचा सराव करतात.
^ग्रामीण भागातीलमुलांमध्ये नैसर्गिकरीत्या अत्युच्च शारीरिक क्षमता असते. आज ग्रामीण भागातील मुलांसाठी चांगली संधी उपलब्ध आहे. परिस्थितीवर उपाय शोधून मार्ग काढला पाहिजे. यंदाच्या २५ यशस्वी मुलांपैकी सर्व मुले अतिशय गरीब परिस्थितीतील आहेत. - बी. एम. गर्जे, मार्गदर्शक
^माझे वडीलदुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात, परंतु मी मात्र निर्धार करून सतत दोन वर्षे कठोर मेहनत केली इतर मुलांना प्रत्येक बाबतीत कसं मागे टाकता येईल याचाच विचार करून सराव करायचो. रडत बसता सराव करत राहिलो, मी आज समाधानी आहे.- सचिन पवार, वसुसायगाव,तुरुंग रक्षक औरंगाबाद
निवड झालेले गोपाल रावते, अनिल धनुरे, सुभाष चंदेल, दीपक िहवाळे आदी.
बातम्या आणखी आहेत...