आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 250 Vehicles Demand From All Marathwada Districts For Minister Council Meeting

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांतून २५० वाहने मागवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑक्टोबरच्या 5 आणि 6 तारखेला शहरात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यासाठी २५० वाहनांची आवश्यकता असून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांतून ही वाहने मागवण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्तालयात सध्या मंत्रिमंडळ बैठकीची जोरदार तयारी केली जात आहे.

तब्बल आठ वर्षांनंतर औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. प्रशासनाच्या वतीने तयारीसाठी अनेक समित्याही नेमल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्तांनी सुभेदारी विश्रामगृह तसेच शहरातल्या रस्त्यांची पाहणी केली होती. टप्प्याटप्प्याने बैठकीची तयारी सुरू आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून ३० वाहने येणार दिमतीला
मंत्रिमंडळबैठकीसाठी २५० वाहने लागणार असून प्रत्येक जिल्ह्यातून ३० वाहने मागवली जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीला सर्व विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांसह सचिव येतात. त्यामुळे वाहनांची आवश्यकता असते. दरम्यान, सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पाटीचीही रंगरंगोटी करण्यात आली.