आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2600 कर्मचारी ड्यूटीवर हजर, 500 बस धावल्या; 23 हजारांवर प्रवाशांची सोय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री संप मागे घेत बससेवा सुरू केली. औरंगाबाद विभागातील २६०० कर्मचारी ड्यूटीवर हजर झाले असून ५०० बस धावायला सुरुवात झाली. भाऊबीजेसाठी बाहेरगावी जाणाऱ्या २३ हजारांवर प्रवाशांची सोय झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे ३०, बुलडाणा ५, जळगाव २, धुळे अशा ३९ आणि सिडको बसस्थानकातून वाशीम, मेहकर, नागपूर, अकोला आदी शहरांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. 
 
ऐन दिवाळीत वेतवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. औरंगाबाद विभागातील २६०० पैकी १९०० ते २३०० कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. ५०० बसेस बंद होत्या. चार दिवसांत सुमारे कोटी ४० लाखांवर आर्थिक नुकसान झाले आहे, तर मराठवाड्यात कोटींवर नुकसान झाले आहे. एसटी कर्मचारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात शेवटपर्यंत तडजोड होऊ शकली नाही. उलट रावते यांच्या वक्तव्यामुळे राज्यभर वातावरण चिघळले होते. यात राज्यातील लाखो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. खासगी वाहनधारकांनी मनमानी भाडे आकारले. संपामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांत सीटचे आगाऊ बुकिंग केल्यामुळे बहुतांश मार्गांवरील बस रिकाम्या धावत आहेत. बसस्थानकातील गर्दीदेखील कमी झाली आहे. 
 
न्यायालयावर विश्वास : २४ऑक्टोबरपर्यंत समिती स्थापन करून एसटी कर्मचारी संघटनांना लेखी कळवण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंतच अंतरिम वाढ देणे, २२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण वेतनवाढीचा निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांच्या आदेशानेच संप मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस हनुमंत ताटे, मुकेश तिगोटे, शैलेश विश्वकर्मा, राजू भालेराव, अजयकुमार गुजर, शेषराव डोणे, सुरेश जाधव यांनी सांगितले.

 अवैध प्रवासी वाहतुकीवर होणार कारवाई : एसटीकर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने खासगी वाहनातून प्रवासी वाहतुकीला राज्य सरकारने परवानगी दिली होती. संप मागे घेण्यात आल्याबरोबर दिलेली परवानगी रद्द झाली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर आता कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 
प्रवाशांच्या संख्येनुसार बस 
प्रवाशांचीसंख्या आणि मागणीनुसार बससेवा उपलब्ध करून दिली जाईल. जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी बुलडाणा, पुणे, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, मेहकर, वाशीम आदी शहरांसाठी जादा बस धावल्या, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख स्वप्निल धनाड सिडकोचे चव्हाण यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...