आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२६ व्या कला महोत्सवाचे उद्या उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा कला विकास महामंडळाच्या वतीने आयोजित २६ व्या विभागीय ललित कला महोत्सवाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ‘जय मल्हार’ मालिका फेम अभिनेते देवदत्त नागे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी न्या. बी. एन. देशमुख राहतील. या वेळी मराठवाडा विभागातील बालकलाकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे.