आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघ निवडणूक: दुपारी 12 वाजता पर्यंत औरंगाबाद विभागात 27.32 टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी दुपारी 12 वाजता पर्यंत 27.32 टक्के मतदान झाले आहे. विधानपरिषदेच्‍या शिक्षक मतदारसंघासाठी या निवडणुका होत आहेत. शिक्षक आमदार निवडून देण्‍यासाठी आज मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यात 275 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. औरंगाबाद विभागात 20 उमेदवार निवडणुकीसाठी उभे असून 6 फेब्रुवारी रोजी एमआयडीसीतील मराठवाडा रिअलटोअर्स येथे मतमोजणी होणार आहे. 
 
औरंगाबाद कार्यालयातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले आहे की, जिल्हयात तसेच विभागात सकाळी 8 वाजता सुरळीतपणे मतदानास सुरवात झाली आहे. अंतिम मतदार यादीनूसार 47,081 पुरुष व 11,329 स्‍त्री शिक्षक मतदार आज मतदानाचा हक्‍क बजावतील. यावेळी त्‍यांनी विभागातील आठही जिल्हयातील मतदानाची टक्केवारी सांगितली. 
 
दुपारी 12 वाजतापर्यंत विभागातील मतदानाची टक्‍केवारी 
औरंगाबाद-13.21 टक्के, जालना-30.69 टक्के, परभणी-33.11 टक्के, बीड-30.76 टक्के, नांदेड-28.03 टक्के, उस्मानाबाद-29.18 टक्के, लातुर-30.69 टक्के, हिंगोलीत 39.68 टक्के मतदान झाले असून विभागात दुपारी 12 वा. पर्यंत एकूण 27.32 टक्के मतदान झाले आहे. 
 
हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य 
मतदानासाठी 13 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्‍ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्‍स, आधार कार्ड, पॅनकार्ड, पदवी प्रमाणपत्र, शासकीय-निमशासकीय तसेच पब्लिक लिमिटेड कंपनीच्‍या कर्मचाऱ्यांचा स्‍वत:चा फोटो असलेले ओळखपत्र, स्‍वत:चा फोटो असलेला शस्‍त्र परवाना, बँक किंवा पोस्‍ट ऑफिसचे पासबूक, अपंगाचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदान करता येणार आहे. 
 
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या मतदान केंद्राना भेटी
विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरातील तहसील कार्यालय, अपर तहसील कार्यालय आणि हडको मधील नुतन बहुउद्देशिय विद्यालय येथील मतदान केंद्रांना भेटी देवून मतदान केंद्राची पाहणी केली.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, औरंगाबादमधील मतदान केंद्र...
बातम्या आणखी आहेत...