आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 लाख शेतकऱ्यांनी घेतले पीक विम्याचे सुरक्षा कवच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंतप्रधानपीक विमा योजनेअंतर्गत यंदा मराठवाड्यातील २८ लाख ११ हजार १८३ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा उतरवला आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनपेक्षित बदल, पावसातील खंड, सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस, कीड रोगाचा प्रादुर्भावामुळे खरीप पिकांना फटका बसला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा तारणहार ठरणार आहे. 

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय कृषी विमा योजना, सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना, हवामानावर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत होत्या. त्यात बदल करून एप्रिल २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली. त्याअंतर्गत मराठवाड्यातील ८०.७४ टक्के म्हणजेच २८ लाख ११ हजार १६३ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा उतरवला आहे. 

या पिकांचा समावेश
भात,ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, तूर, तीळ, कराळे, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस, कांदा, ऊस या पिकांकरिता विमा लागू आहे. 

सर्वशेतकऱ्यांना लाभ द्या
खाद्यान्न,डाळी आणि तेलबियांसाठी विम्याचा एक हंगाम, एक दर निश्चित केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्पन्नाचा अचूक अंदाज विम्याचे दावे वेगाने निकाली काढण्यासाठी मोबाइल आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करावा. मराठवाडा, विदर्भ, खान्देशातील स्थिती जाणून घ्यावी, इच्छा असूनही विमा उतरवू शकलेल्या शेतकऱ्यांनाही विमा मिळावा. एकूण पीक क्षेत्राचा विम्यात समावेश करावा, अशी मागणी कृषितज्ज्ञ एच. एम. देसरडा, काकासाहेब शिंदे यांनी केली आहे.
 
जिल्हा- विमाधारक - टक्केवारी 
औरंगाबाद-  ४८८०५४ - ९१.७७ 
जालना - ३१७२६७ - ७७.३२ 
बीड - ७०६६५९ १०८.४२ 
लातूर - ५४९१५ - १४.९६ 
उस्मानाबाद - ३३८९०६ - ९५.०४ 
नांदेड - ५२७७०२ - ९०.६४ 
हिंगोली - १५८८९२ - ७४.४२ 
परभणी - २१९०६८ - ६२.९७ 
एकूण - २८११४६३ - ८०.७४ 

यंदा दुष्काळाचे सावट 
गतवर्षीसमाधानकारक पाऊस झाला होता. यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, असे संकेत हवामान विभागाने वर्तवले होते. मात्र, मराठवाड्यातील २९ तालुक्यांतील स्थिती अतिशय नाजूक आहे. पावसाच्या खंडाने ४७ लाख हेक्टरवरील पिके करपत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...