आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीनंतर मराठवाड्यात 281 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढतच असून कर्जमाफीच्या घोषणेनंतरही मराठवाड्यातील २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक ६२ आहे. जानेवारी ते १७ सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील ६६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी मिळावी, यासाठी जून महिन्यात विविध शेतकरी संघटनांनी संप पुकारला होता. या संपामुळे राज्यभरातील व्यवहार ठप्प झाल्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. 
 
औरंगाबाद जिल्ह्यात जूननंतर आतापर्यंत ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जूनमध्ये १२, जुलैत ९, ऑगस्टमध्ये तर सप्टेंबर महिन्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत ८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी ६३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. १८ प्रकरणे अपात्र ठरली असून प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...