आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२९ लाखांचा अपहार; जामीन फेटाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
आैरंगाबाद - जिल्हापरिषदेत सौरदिवे खरेदी प्रकरणात २९ लाख ४० हजारांचा अपहार करणाऱ्या जिल्हा परिषदेचे तत्कालीन सभापती आणि सीईओ यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सात जणांच्या अटकपूर्व जामिनावर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी जामीन फेटाळण्याचे आदेश दिले.
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या घरात सौरदिवे लावण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी बनावट लाभार्थींची यादी तयार करून २९ लाख ४० हजार रुपयांचे दिवे खरेदी करण्यात आले. या प्रस्तावाला तत्कालीन समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, संभाजी लंगोरे, मुख्य लेखाधिकारी विलास जाधव, समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे, डी. डी. जोशी, समाजकल्याण निरीक्षक एस. एम. शिंदीकर यांनी मान्यता देत अपहार केला असल्याचे निष्पन्न झाल्याचे शिवसैनिक राजेंद्र राठोड यांनी उघडकीस आणले. न्यायालयाच्या आदेशावरून त्या सात जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी त्या सात जणांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्यासमोर अर्ज दाखल केला. आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता सहायक लोकअभियोक्ता विनोद कोटेचा आणि फिर्यादीचे वकील एस. पी. पडूळ यांनी हा गुन्हा गंभीर आहे, शासनाची फसवणूक केली असून त्यांना अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. न्यायालयाने ही विनंती ग्राह्य धरून त्या सात जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.