आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 D V R And 6 CCTV Cameras Set At Cidco 5, News In Marathi

६१ हजारांत कॉलनी सुरक्षित, अरुणोदय, सह्याद्री कॉलनीत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको एन-५ मधील सिद्धिविनायक मंदिर समितीच्या पुढाकाराने सह्याद्रीनगर व अरुणोदय कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. ६१ हजार रुपये खर्चून नागरिकांनी सीपीप्लस चायनामेड कंपनीचे ३ डीव्हीआरचे ६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कॉलनीच्या सुरक्षिततेचा कायमचा बंदोबस्त केला.

दोन्ही कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वारालगत रस्त्यांवर सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संच लावल्याने कॉलन्यांमधील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात कैद करण्याची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवारी गणेश जयंतीचे औचित्य साधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण "दिव्य मराठी'चे निवासी संपादक दीपक पटवे, नगरसेविका रेखा जैस्वाल, माजी मंत्री नामदेव गाडेकर, सिद्धिविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष मनोज गुप्ता, माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील सिद्धिविनायक मंदिरातून वर्षभरापूर्वी पंचधातूची मूर्ती चोरीला गेली होती. त्यानंतर दोन मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या. तसेच मंदिरातील दानपेटीही चोरट्यांनी लंपास केली होती. यामुळे या दोन्ही कॉलनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी सीसीटीव्हीच्या रूपाने तांत्रिक सुरक्षारक्षक ठेवण्याची कल्पना पुढे आली. आता मात्र गुन्हेगारी कारवाया सीसीटीव्हीत कैद होतील.
निधी जमवला
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संच खरेदी करण्यासाठी कॉलनीतील प्रत्येक सदस्याने वर्गणी दिली. त्याशिवाय कॉलनीत होणारे अंगारक चतुर्थी, कोजागरी पौर्णिमा, गणेश जयंती, गणेशोत्सव आदी सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून बचत केली. यातून जमलेल्या पैशांतून सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आले.