आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड, करमाड - नापिकी आिण कर्जबाजारीपणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे. चार वर्षांपासूनचा सततचा दुष्काळ शेतकऱ्यांसाठी मरणकाळ ठरत आहे. गणेश जानकीराम दवंगे (३३, रा. पिशोर, ता. कन्नड), सोमनाथ नबाजी पठाडे (३०, वरझडी, ता. औरंगाबाद), बंडू साहेबराव बुरकूल (३८, टाकळीमाळी, ता. औरंगाबाद) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

दवंगे यांना ३० गुठे शेती आहे. त्यात यंदा कपाशीची लागवड केली होती; परंतु कापसाचे उत्पादन कमी झाले. त्यातच कापसालाही कमी भाव मिळाल्याने ते आर्थिक अडचणी सापडले होते. त्यातच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा आणि डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेने ते त्रस्त होते. त्यामुळे दवंगे यांनी बुधवारी दुपारी विषारी औषध शेतात प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर मृतदेह पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे, तर पठाडे यांनीही मंगळवारी, तर बुरकुल यांनी बुधवारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यामुळे करमाड वरझडी, टाकळी माळी या गाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करत आहेत. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास करमाड पोलिस करत आहे.