आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांच्या गर्भवतीचा रुग्णालयात नेताना मृत्यू, मृत्यूस मित्र जबाबदार असल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : तीन महिन्यांच्या गर्भवतीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उस्मानपुरा भागातील नागसेननगरात शनिवारी घडली. कोमल ज्ञानेश्वर अडागळे (२०, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) असे मृत तरुणीचे नाव असून कुत्रा चावल्याने तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत्यू संशयास्पद असून सोबत राहणारा मुलगा तिच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. 
 
विवाहित कोमल लग्नानंतर काही दिवसांत विभक्त झाली होती. त्यानंतर ती प्रजित शिनगारे या तरुणासोबत राहत होती. परंतु या दोघांतही वाद सुरू होते, त्यावरून प्रजित तीला नेहमी त्रास देत होता, असा आरोप कोमलच्या नातेवाइकांनी केला. कोमलच्या बहिणीने प्रजितविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती.
 
दरम्यान, आईकडे राहणारी कोमल तीन महिन्यांची गर्भवती होती. आठ दिवसांपूर्वीच प्रजित तिला घरी घेऊन गेला होता. कुत्र्याने चावा घेतल्याने शनिवारी दुपारी कोमलला घाटीत दाखल करण्यात आले. कोमलची आई लक्ष्मीबाई यांनी रुग्णालयात तिची भेट घेत पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जाण्यासाठी घरी आलेली कोमल चक्कर येऊन बेशुद्ध पडली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आला. शवविच्छेदन अहवानानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यावरून कारवाईची दिशा ठरेल, असे पोलिसांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...