आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला आत्महत्येस प्रवृत; पतीस 3 वर्षे सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - पत्नीस आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या सिल्लोड येथील रिक्षाचालकास सहाय्यक सत्र न्यायाधीश एस. एम. तपकीर यांनी दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
आैरंगाबाद येथील रहेमानिया कॉलनीतील रजियाचा सिल्लोडच्या मिर्झा कॉलनीतील हारुण बेग बाबू बेग सोबत २७ फेब्रुवारी १९९८ रोजी विवाह झाला होता. तीन वर्षांनंर हरुणने पत्नीला रिक्षा खरेदीसाठी माहेरहून दोन लाख रूपये आण असा लकडा लावत होता. २५ मार्च २०१४ रोजी रात्री हरुण आणि रजिया यांच्यामध्ये पैसाच्या कारणवरुन भांडण झाले. त्याच १४ वर्षीय मुलगा अजीम जेवण करुन झोपला असताना मध्यरात्री जोरजोरात आरडा ओरड सुरु झाल्यामुळे तो जागा झाला त्या वेळी त्याने आई रजियाला जळताना पाहिले. त्याने आईला विझविण्यासाठी वडिलास सांगत होता पण तो शांतपणे बसून रजियाकडे पाहत होता. शेवटी शेजाऱ्यांनी महिलेस बाहेर काढले.

तत्कालीन पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्याची सुनावणी सहाय्यक जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. तपकीर यांच्यासमोर सुनावणी झाली असता विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी सहा साक्षीदार तपासले. रजियाचा मुलगा अजीम, शेजारी राहणारी महिला शमीनाबी जुमान्ना खान पठाण, ताहेर अहेमद खान पठाण या तिघांची साक्ष महत्वाची ठरली. अॅड. मुगदिया यांना अॅड. मीरा क्षीरसागर यांनी सहकार्य केले. न्यायलयाने हरुण बेग यास वर्ष सक्तमजुरी, हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिने साधी कैद, शाररिक छळ केला म्हणून एक वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.

‘तिने’ सर्व प्रकार बहिणीला सांगितला
तिला सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती शब्बीर ताहेर यांनी रजियाचा भाऊ हमीद खान यास दिली. भावाने तिला घाटीत हलवले. रुग्णवाहिकेत रजियाची बहीणही बसली होती. तिने सर्व प्रकार बहिणीला सांगितला. उपचारादरम्यान २६ मार्च २०१४ रोजी दुपारी मरण पावली. हमीद खान अहमद खान यांच्या तक्रारीवरुन सिल्लोड ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
बातम्या आणखी आहेत...