आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणात ८३६ दलघमी जलसाठा; मराठवाड्यातील धरणांत अजूनही 30.85 टक्के पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील सर्व धरणांत सध्या ३०.८५ टक्के साठा शिल्लक आहे. गत पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यंदा ०७ एप्रिल रोजी एवढा साठा शिल्लक असण्याचे हे प्रमाण सर्वाधिक ठरते. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पांत म्हणजेच जायकवाडी धरणात ३८ टक्के पाणी उपलब्ध आहे.
 
गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पीय साठ्याची स्थिती समाधानकारक आहे. मोठ्या धरणातील साठ्याची स्थिती चांगली असून मध्यम आणि लघु प्रकल्पातील साठा मात्र झपाट्याने कमी होत आहे. मराठवाड्यातील ८५४ प्रकल्पांची साठवण क्षमता ७९९६ दलघमी असून सध्या २४६६ दलघमी पाणी शिल्लक आहे.
 
मोठ्या प्रकल्पात ३३ टक्के पाणी: जायकवाडीधरणाची प्रकल्पीय क्षमता २१७१ दलघमी असून धरणात सध्या ८३६ दलघमी उपयुक्त साठा आहे. गतआठवड्यात ९०१ दलघमी जलसाठा होता. जायकवाडीत २०१२ मध्ये ३८१ दलघमी, २०१३(००), २१०४(३१६) तर सन २०१५ मध्ये ५५९ दलघमी साठा होता.
 
येलदरी धरणात ७३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा (०९ टक्के) तर सिद्धेश्वर धरणात ८१ दलघमी पाणीसाठा (१८ टक्के) आहे. चार वर्षांपासून सातत्याने कोरड्या राहणाऱ्या मांजरा धरणात १११ दलघमी साठा (६३ टक्के) आहे.
 
माजलगावमध्ये १५४ दलघमी (४९ टक्के), ऊर्ध्व पैनगंगामध्ये २१ टक्के, निम्न तेरणामध्ये ७० टक्के, मनार ४५, विष्णुपुरी ०८, दुधना ६८ आणि सिनाकोळेगाव २५ टक्के साठा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील एकूण ११ मोठ्या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ५१४३ दलघमी असून त्यात सध्या १६९२ दलघमी (३२.९० टक्के) पाणी आहे. या प्रकल्पांत एप्रिल २०१२ रोजी १०९३ दलघमी, सन २०१३ मध्ये याच दिवशी ३४६ दलघमी, २०१४ (१७४१) तर २०१५ मध्ये १४०४ दलघमी साठा होता.
 
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत 8 टक्के पाणी
औरंगाबादजिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प असून त्यांची प्रकल्पीय क्षमता २०५ दलघमी आहे. या प्रकल्पांत सध्या १६ दलघमी (८ टक्के) पाणीसाठा आहे. गिरजा, वाकोद, नारंगी आणि बोरदहेगाव या प्रकल्पात शून्य टक्के साठा आहे. लहुकी प्रकल्पात १.१३ दलघमी, गडदगड १.८१ दलघमी, पूर्णा नेवपूर ३.०९, ढेकू ३.३० पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ९० लघु प्रकल्पांत २६.९८ दलघमी (१५ टक्के) साठा आहे.
 
बातम्या आणखी आहेत...