आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत महिला महाविद्यालयात 30 विद्यार्थिनींना विषबाधा; खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निराला बाजार येथील डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या वसतीगृहातील 30 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थिंनी गोड जेवण देण्यात आले होते. त्यातून ‍त्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
काल (मंगळवारी) दुपारी 12 वाजता जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनींना पोटदुखी व उलटीचा त्रास सुरु झाला. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने विद्यार्थिनींना क्रांती चौक येथील हायटेक आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले. 15 विद्यार्थिंनीना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. 15 विद्यार्थिनींवर उपचार सुरु आहेत. कॉटची व्यवस्था नसल्याने चार विद्यार्थिंना आयसीयुत दाखल करण्‍यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. धनंजय खाटवकर यांनी सांगितले.

काय म्हणाले पोलिस..?
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आढे यांनी सांगितले की, हायटेक आधार हॉस्पिटलमधून विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली. विद्यार्थिंनीच्या उलटीचे नमुने राखून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस चौकशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...