आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकोडमध्ये होणार ३० लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरापासून २२ किमी अंतरावर असलेल्या एकोड-पाचोड परिसरातील १२ हेक्टर गायरान जमिनीवर ९९ हजार रुपये खर्च करून एक मीटर खोल आणि एक मीटर रुंद अशा आकाराचे समतल चर तयार केले आहेत. या माध्यमातून मान्सूनमध्ये ३० लाख लिटर पाणी जमिनीत जिरून जलपुनर्भरण होणार आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे समतल चराच्या बांधावर कडुलिंब सीताफळ बियांची लागवड करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.
सर्वांना पाणी मिळावे, टंचाईमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत जिल्हा कृषी विभागाने एकोड येथील गट क्रमांक ८० मधील बारा हेक्टर जमिनीवर उतारास अाडवे चर खोदले आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाता त्यामध्ये साचून जलपुनर्भरण होत आहे. १८ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. बांधावर वृक्षलागवड केल्यास पुनर्भरण आणि वनक्षेत्रात वाढ होईल. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले. या वेळी आ.संदिपान भुमरे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, कृषी सहसंचालक कैलास मोते, विभागीय अधीक्षक पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी शशिकांत हदगल, धर्मेंद्र कुलथे, उदय देवळाणकर, पी. के. उगले, कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते, प्रकल्प उपसंचालक पी. बी. चव्हाण, तहसीलदार रमेश मुनलोड, गटविकास अधिकारी विजय परदेशी, मंडळ अधिकारी रोहिदास राठोड, सरपंच परसराम चव्हाण, उपसरपंच अशोक शिंदे, रायभान खाडे उपस्थित होते.
एकूण क्षेत्र १२ हेक्टर
मीटर खोल मीटर रुंद समतल चर बांधावर १५०० सीताफळ १५०० कडुलिंबाच्या बियांची लागवड करण्यात येणार आहे. वाहून जाणारे पाणी उतारास चर खोदून अडवल्याने जिथल्या तेथे अडवले जाऊन जलपुनर्भरण होणार आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...