आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातील ग्रंथालयात अनियमित पद्धतीने भरती झालेल्या 30 ग्रंथपाल बडतर्फ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यभरातील ग्रंथालयात अनियमित पद्धतीने भरती झालेल्या 30 ग्रंथपाल, तांत्रिक सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिकांना 31 जानेवारी रोजी महाराष्‍ट्र शासनाकडून सेवा समाप्तीचे पत्र देण्यात आले. खोटी कागदपत्रे व गैरप्रकार करून हे कर्मचारी रुजू झाल्याचे सिद्ध झाले आहे. यात मराठवाड्यातील 11 कर्मचा-यांचा समावेश असून गेल्या 14 वर्षांपासून ते कार्यरत होते.
ही माहिती शासकीय ग्रंथालयाच्या पदाधिका-यांनी दिली. 2005 मध्ये शासनाच्या विविध विभागांतील अनियमित भरती प्रकरणी उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्या निकालानुसार ही कारवाई झाली असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले.