आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील 30 हजारांवर घरांना आहे हायटेन्शन तारांचा धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती आहे. अगदी घरांना खेटून तारा तारांचे जाळे दिसते. - Divya Marathi
शहरातील अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती आहे. अगदी घरांना खेटून तारा तारांचे जाळे दिसते.
औरंगाबाद- नागपूर शहरात नुकताच हायटेन्शन वीज तारांमुळे तीन लहान मुलांचा मृत्यू झाला. तशीच किंबहुना त्याहीपेक्षा धोकादायक स्थिती आपल्या औरंगाबाद शहरातही आहे. शहरात जवळपास ३० हजार घरांना खेटून या हायटेन्शन तारा आहेत. जवळपास दीड लाख लोक सतत या धोकादायक स्थितीत राहतात. शिवाय लोंबकळणाऱ्या तारा आणि पडायला आलेले खांबही ठिकठिकाणी दिसतात. दुसरीकडे घरे बांधताना होणारे अतिक्रमणही यासाठी जबाबदार आहे. 
 
या भागात आहे जास्त धोका : शहरातील पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर परिसर, जय भवानीनगर, पडेगाव, टीव्ही सेंटर परिसर, विष्णुनगर येथे पाहणी केली असता हाय व्होल्टेजच्या विद्युत तारा नागरिकांच्या गॅलरीला चिकटून जात आहेत. यापासून बचाव म्हणून नागरिकांनी फक्त प्लास्टिकचे पाइप या तारांवर लावले आहेत. मात्र, हा उपाय तात्पुरता आणि तकलादू आहे. सिडको-हडको परिसर, मुकुंदवाडी, राजनगर, अंबिकानगर, खोकडपुरा या भागातही अनेक घरांना लागूनच उच्च दाबाच्या तारा जातात. 
 
३० हजारांवर इमारतींना धोका : जुनी यंत्रणा आणि अवैध बांधकामे यामुळे वीज सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. शहरातील लाख नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील सुमारे ३० हजारांपेक्षा जास्त इमारती आणि घरांना विद्युत तारांचा स्पर्श होत आहे. यामुळे त्यांचा जीव सतत टांगणीला लागलेला असतो. 
 
कंपाऊंड, घरांमध्ये विजेचे खांब... 
शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली, अनेक लोकांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये विजेचे खांब असून त्याच ठिकाणी या लोकांच्या चारचाकी वाहनांचे पार्किंगसुद्धा आहे. पावसाळ्यात तसेच जोराची हवा आल्यानंतर अनेकदा विद्युत तारा एकमेकांना चिकटून स्पार्किंग होत असते. एखादी ठिणगी गाड्यांवर पडली तर गाडीतील पेट्रोल, डिझेलमुळे आणखी धोका होऊ शकतो. शिवाय घरातील लहान मुलांकडे सतत लक्ष द्यावे लागते. गुंठेवारी परिसरातही अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. 
 
आम्ही नव्हे, लोकच जबाबदार 
आमच्या विभागातर्फेविद्युत खांब हे खूप आधी योग्य जागा सोडून उभे केलेले असतात, पण त्यानंतर जेव्हा प्लॉटिंग होते, त्या वेळी प्लॉट विकणारा आणि विकत घेणारा तेवढी जागाही सोडत नाहीत. जी घरे बाँडची असतात ते तर एक इंचही जागा सोडत नाहीत. प्लॉट एनए झाल्यानंतर ग्राहकाने आम्हाला सांगून विजेची तार अथवा खांब हटवावा. मात्र, याचा खर्च हा ग्राहकाने द्यायचा असल्याने ते टाळतात. नंतर घरे बांधल्याने खांबही घराच्या आवारात दिसतात. शहरात जवळपास ३० हजार घरांना हा धोका आहे. -बी. एम. कुमावत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण 
 
 
बातम्या आणखी आहेत...