आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवगावात युवकाची आत्महत्या, पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा- भिवगाव येथील तीस वर्षीय युवकाची बोरसर येथे आत्महत्या. वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथील रहिवासी दिलीप अशोक त्रिभुवन (३० वर्षे) या युवकाने बोरसर येथील गावातील बारवेत आत्महत्या केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी नुकतीच घडली.

बोरसर येथील महिला रोजच्या प्रमाणे बारवेवर पाणी काढत असताना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला. या वेळी महिलांनी ओरड केली असता परिसरातील नागरिक त्या ठिकाणी धावून आले ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण गावात पसरली या घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील यांनी भ्रमणध्वनीवर वैजापूर पोलिस ठाण्यास कळवताच येथील पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास भिकाने, नारायण कटकुरे, गणेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन येथील नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचा चेहरा ओळखला जात नसल्याने सर्व जण गोंधळून गेले, परंतु त्याच्या खिशातील मोबाइल मिळून आल्याने त्यातील सिम कार्डमधील नंबरवर फोन केल्यास तो भिवगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यात घडलेल्या घटनेची माहिती नातेवाइकांना देऊन घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास श्रीनिवास भिकाने नारायण कटकुरे करत आहेत.