आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकोदला 32 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 खामगाव- फुलंब्री तालुक्यातील वाकोद येथे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. रामदास लळुबा लहाने (३२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 
 
वाकोद येथे गट क्र. २४२ मधील अांब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी त्यांचे बंधू शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही रामदास याने दोन वेळा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 
 
पोलिस पाटील दिगंबर ताठे यांच्या माहितीवरून वडोदबाजार पोलिस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास  सहायक फौजदार एस. एस. साळवे व  मेटे हे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...