आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये 7 वर्षांत विजेच्या धक्क्याने 323 जणांचा मृत्यू, 187 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - जिल्ह्यात एप्रिल २०१० ते मार्च २०१७ या सात वर्षांत विजेचा धक्का लागून ५७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३२३ मनुष्य २४७ पक्षी, प्राण्यांचा समावेश आहे, तर १८७ व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. उच्च कमी दाब, वाहिन्यांचे स्पार्किंग होऊन विद्युत उपकरणे, घर, पिके, वृक्ष असे ३७९ जळीत प्रकरणे घडली आहेत.
 
एकूणच जमिनीकडे झुकलेल्या वाहिन्या, उघड्या, जमिनीला टेकलेल्या डीपी, असुरक्षित वीज हाताळणीचे कामे अतिशय धोकादायक ठरत अाहेत. जीवित हानीसह मोठी आर्थिक हानीदेखील होत असल्याची नोंद महावितरणच्या विद्युत निरीक्षक विभागाने घेतली आहे.
 
शहर ग्रामीण भागात कृषी, उद्योग, व्यापार केंद्र, छोटे मोठे व्यवसाय, पाणीपुरवठ्यासाठी वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्या तुलनेत विकास कामे झाली नाहीत. ग्राहकांच्या संख्येनुसार रोहित्रे नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. रोहित्र जमिनीला टेकले असून ते उघडे आहेत. वाहिन्या जमिनीकडे झुकलेल्या आहेत. रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला विद्युत तारांचा स्पर्श होईल, अशी भयावह स्थिती अनेक ठिकाणी आहे.
 
सर्वात गंभीर म्हणजे इमारतीला वाहिन्या चिकटून आहेत. विद्युत खांब, वाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. खांबाला जागोजागी आधार देण्यात आला आहे. वीज चोरी गळतीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे वारंवार फ्यूज उडणे, शॉर्टसर्किट होणे, उच्च कमी दाब होऊन सतत वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे, आठ ते दहा तास वीज गुल राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. याची नोंद महावितरणच्या विद्युत निरीक्षक विभागाने घेतली असून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला आहे.
 
आश्वासनाची पूर्तता कधी?
गतवर्षी मे महिन्यात औरंगाबादेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावातील समस्यांचा तेथेच निपटारा करण्यासाठी ग्रामपंचायतीवर जबाबदारी सोपवणे, एक लाइनमन नियुक्त करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यामध्ये शून्य लाइनमनकडून काम केल्याचे किंवा त्याचा अपघात झाल्यास संबंधितांवर मनुष्यवधाचे गुन्हे दखल करण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, जीवित हानीचे प्रमाण बघता प्रत्यक्षात उक्तीप्रमाणे कृती झाली नसल्याचे दिसून येते.
 
जळीत प्रकरणे
क्षमतेपेक्षा १०० केव्ही उच्च दाबाने पुरवठा होऊन विद्युत उपकरणे जळणे, वादळ वाऱ्यामुळे जमिनीकडे झुकलेल्या वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या उडून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यात ऊस, गहू, मका, फळबाग, विशाल वृक्ष जळून खाक होत आहे. सात वर्षांत ३७९ प्रकरणे घडली आहेत. गतवर्षी दर महिन्याला दोन घटना घडून मोठी आर्थिक हानी झाली आहे. गत सहा वर्षांत दर महिन्याला सहा दुर्घटना घडल्या आहेत.
 
अनेक ठिकाणी हलगर्जीपणामुळेच होतात मोठे अपघात
ग्राहकांच्या संख्येनुसार उपकेंद्रे, कर्मचारी, रोहित्रे नाहीत. गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी हजर नसतात. ग्रामीण भागातील नवशिके तरुण जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. या वेळी दुर्घटना घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. तर काही अपघात हे घराला वीजपुरवठा करणारी वायर खराब झाल्याने आतील तांबे अॅल्युमिनियमची तार उघडी पडून संपूर्ण घरात विद्युत प्रवाह उतरून झाले आहेत. विद्युत लोखंडी खांबाला गाय, म्हशी, शेळ्या बांधले जातात. येथे वाहिन्या तुटून, विद्युत प्रवाह उतरलेल्या उपकरणांना स्पर्श होऊन मानवाबरोबर पक्षी प्राणी दगावले आहेत. विशेष म्हणजे इमारतीला चिकटलेल्या वाहिन्या उघड्या, जमिनीला टेकलेल्या डीपी अतिशय धोकादायक ठरत आहेत. सुरक्षित साधनांचा वापर केला जात नाही.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, गत सात वर्षांतील विजेच्या अपघातातील मानव प्राण्यांच्या बळींचा आलेख..
 
बातम्या आणखी आहेत...