आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात वर्षभरात नवे 33 पूल,1200 कि.मी. रस्ते, सा.बां. विभागाचे अभियंता सुरकुटवार यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील नद्यांवरून जाणारे जुने पूल दुरुस्तीसह ३३ नवे पूल बांधण्यात येणार आहेत तसेच १२०० किलोमीटरचे रस्ते डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होतील. यासाठी ८७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अशी महिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सुभेदारी विश्रामगृहावर सुरुकुटवार यांनी संवाद साधला या वेळी अधीक्षक अभियंता ए.बी. सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांची उपस्थिती होती. त्यांनी सांगितले की, आमचा विभाग बदलत आहे पूर्वीची प्रतिमा बदलत आहे. लोकांना ही माहिती स्पष्टपणे व्हावी म्हणून या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिल्याने ही पत्रकार परिषद घेऊन माहिती देत आहे. 

मराठवाड्यात एकूण २० हजार किलोमीटरचे रस्ते करण्याचा आराखडा आहे मात्र चालू वर्षात १२०० किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतील. यासाठी ६७६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत यापैकी पाचशे कोटींची कामे पूर्ण झाली आहेत अाम्ही एकूण १०८५ कोटी रुपये मागितले आहेत. यात तीन सर्कल आठ जिल्ह्यांतील रस्त्यासह पुलांची कामे होणार आहेत.
 
सिल्लोडमध्ये नवे पूल.. 
यंदाच्यापावसाळ्यात अनेक पूल वाहून गेल्याच्या घटनेची दखल राज्य सरकारने घेत मराठवाड्यातील नदीवरील पुलांची डागडुजीसह काही पूल पाडून नवे बांधण्यात येणार असल्याचे सुरकुटवार यांनी सांगितले. यात औरंगाबाद जिल्ह्यात तीन पूल होतील यात सिल्लोड तालुक्यातील गुलमस्त गिरजा नदीवरील पैठणजवळील आपेगाव येथे तुटलेला मोठा पूल तोडून पुन्हा नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्या कामाला सुरुवातही झाली आहे. 

मराठवाड्यात हे रस्ते होणार.. 
मराठवाड्यातपहिल्या टप्प्यात जालना येथील दोन्ही बायपास रोड, सिल्लोड रस्ता, शिऊर रस्ता,औरंगाबाद -नांदेड, वाटूर-जिंतूर, बीड-परळी, अंबाजोगाई-अहमदपूर, धर्मपुरी - रेणापूर, लातूर बार्शी,माहूर बायपास, अशी कामे होणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...