आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 33 हजार नागरिकांची पेन्शन रखडली; प्रशासन म्हणाले, 2 दिवसांत जमा होतील पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्ह्यातील३३ हजार पेन्शनधारकांची नोव्हेंबरची पेन्शन रखडली आहे. दर महिन्याला ३० तारखेला ही पेन्शन जमा होते. मात्र एसबीआयच्या सीएमपी पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे पेन्शन रखडली असून दोन दिवसांत संबंधितांच्या खात्यावर पेन्शन जमा करण्यात येईल, अशी माहिती अपर कोशागार अधिकारी उन्मेष बब्रुले यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३३ हजार पेन्शनधारकांचे ४५ कोटी रुपये दर महिन्याला वेळेत बँकेत जमा होतात. मात्र नोव्हेंबरची पेन्शन या महिन्याच्या तारखेपर्यंतही मिळाल्यामुळे निवृत्त कर्मचारी लेखा कोशागार विभागात चकरा मारत आहेत. अपर कोशागार अधिकारी बब्रुले म्हणाले, पेन्शनधारकांचे पैसे २९ तारखेला कोशागार विभागातून एसबीआयच्या सीएमपी प्रणालीद्वारे जमा होतात. हैदराबादमध्ये असणाऱ्या सीएमपी पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत पैसे मिळतील.

 

कोशागार विभागात नोटीस लावली : याबाबत कोशागार कार्यालय, निवृत्त पेन्शन विभागात नोटीस लावण्यात आली आहे. अनेकदा औषधी, गोळ्यांसाठी पैशाची गरज भासते. पेन्शनधारकांसमोर दुसरा पर्याय नसतो. अनेकांचे कुटुंब पेन्शनवर अवलंबून असते. त्यामुळे पेन्शन मिळाल्याने अनेकांची अडचण झाली आहे.

 

एकाच वेळी होतात पैसे जमा :  एकाचवेळी मोठ्या प्रमाणात (बल्क) पेमेंटसाठी सीएमपी प्रणालीचा वापर केला जातो. या पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे.

 

पाठपुरावा सुरू
पेन्शन वेळेत मिळाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले रखडली आहेत. अनेकदा कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असते. आम्ही कोशागार विभागाकडे वेळेत पेन्शन देण्याची मागणी केली आहे.
- वसंत सबनीस, अध्यक्ष, जिल्हा पेन्शनर संघटना.

बातम्या आणखी आहेत...