आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाकडून ३४ जागांचे लीज रद्द, बाजारभावाने भाडे आकारणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पूर्वीची नगर परिषद तसेच महानगरपालिकेने आपल्या ठिकठिकाणच्या जागा नाममात्र दराने संस्था, संघटना तसेच वैयक्तिक पातळीवर ९९, ९० तसेच ३० वर्षांच्या भाडेकरारावर (लीज) दिल्या आहेत. मात्र, काहींनी याची विक्री केली तर काहींनी पोटभाडेकरू ठेवून पैसे कमावले. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले सर्व लीज रद्द करून लीजधारकांकडून रेडिरेकनरनुसार भाडे आकारले जाणार आहे. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत यास मंजुरी देण्यात आली. या यादीत शिवसेना चालवत असलेल्या शिवाई सेवा ट्रस्टच्या जागेचा उल्लेख बघून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा तिळपापड झाला. काही सामाजिक संस्थांना यातून वगळावे, अशी सूचना सेनेच्या सदस्यांनी केली. त्यानंतर दुरुस्तीसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

जागांचा उल्लेखच नाही : पालिकेनेलीजवरदिलेल्या ३६ जागांची यादी पालिका प्रशासनाने सादर केली. यात पैठण गेट, पीर बाजार, बारुदगरनाला, पिया मार्केट, सिडको एन-५, मुकुंदवाडी, चिकलठाणा येथील व्यापारी संकुलांचा उल्लेखच नाही. काही नगरसेवकांनी यातील काही जागांचा उल्लेख केला. तेव्हा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी त्याची नोंद करून घेतली.


तरपालिकेला लाखो रुपये मिळणार : प्रस्तावाबरोबरचप्रशासनाने ३६ जागांची यादी दिली आहे. यात औषधी भवन, बॉम्बे मर्कंटाइल बँक, मराठा सेवा मंडळ, पीपल्स बँक आदी जागांचा समावेश आहे. या जागेचे सध्या पालिकेला काही हजारांत भाडे भेटते. तेथे रेडिरेकनर लावण्यास हेच वार्षिक भाडे लाखांत जाणार आहे. यामुळे पालिकेचा फायदाच होणार हे स्पष्ट आहे.

पालिकेचीजागा भाड्याने घेतलेले काय करतात? : ज्यांनीपूर्वी पालिकेच्या जागा लीजवर घेतल्या त्यापैकी अनेकांनी त्या विकल्या. जेथे दुकाने आहेत तेथे पोटभाडेकरू आहेत. काही पोटभाडेकरूंनीही ते तिसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिले. म्हणजे भाडेकरूकडून दरमहा १० हजार रुपये भाडे घ्यायचे अन् महानगरपालिकेला वर्षाला एक हजार रुपये भरायचे, असा हा प्रकार आहे. काहींकडे तर कागदपत्रेही नाहीत तरीही त्यांच्याकडे पालिकेच्या जागेचा किंवा गाळ्यांचा ताबा आहे. काही जागांचे पालिकेला भाडेही मिळत नाही.

‘शिवाई’मुळेकोंडी : प्रशासनाकडूनहा प्रस्ताव ऐनवेळी सादर करण्यात आला. त्यात नेमक्या कोणत्या जागांची यादी आहे, याची कल्पना नगरसेवकांना नव्हती. प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सेना नगरसेवकांना या यादीत शिवाई सेवा ट्रस्टचा समावेश असल्याचे लक्षात आले अन् सर्वांचीच कोंडी झाली. तेव्हा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था यातून वगळण्याची सूचना राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ यांनी केली. तेव्हा महापौरांनीही दुरुस्तीसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तेव्हा भाजपचे राज वानखेडे म्हणाले, शिवाईप्रमाणेच टिळकपथवरील मराठा सेवा मंडळही सामाजिक कार्य करते. त्यामुळे त्यांनाही वगळण्यात यावे, अशी सूचना केली. तीही महापौरांनी मान्य केली. प्रशासनाकडून आलेली यादी ही प्राथमिक होती. त्यात अनेक जागांचा अजून समावेश नाही. त्यामुळे यात आणखी काही जागांचा समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्याच्या नावाखाली काही संस्थांना वगळले जाण्याचीही शक्यता मोठी आहे.

शहरप्रमुखम्हणतात बेरोजगारांना ‘शिवाई’तील गाळे देणार : शिवाईयेथील गाळे काही हजार रुपये भाड्याने मिळणार अशी चर्चा आहे. तेथे शिवसेनेचे कार्यालयही राहील. तेथे नेमके कोणते सामाजिक कार्य चालते हे सेनेचे पालिकेतील गटनेते तथा शहरप्रमुख राजू वैद्य यांना विचारले असता इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शिवाईकडून येथील गाळे हे सुशिक्षित बेरोजगारांना भाड्याने दिले जाणार आहेत. त्यातून कोणतेही उत्पन्न मिळवण्याचा आमचा इरादा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाईची इमारत बांधून पूर्ण झाली असली तरी कामात काही बदल केल्याने महानगरपालिकेने इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे ही इमारत पडून आहे.

उत्पन्नलाखांहून कोटींपर्यंत वाढण्याचा दावा : शहरातीलमोक्यावरील ३६ जागांच्या लीज रद्द करून रेडिरेकनरनुसार भाडे आकारल्यास पालिकेचे उत्पन्न लाख ७९ हजार ३६० रुपयांवरून कोटी ९० लाख ५६ हजार ४२८ रुपयांवर जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. शनिवारच्या सभेत सादर केलेल्या ३६ जागांतून पालिकेला फक्त लाखांच्या पुढे उत्पन्न आहे. परंतु रेडिरेकनरनुसार दर आकारल्यास ते कोटींच्या आसपास जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. जर सर्वच जागांचे लीज रद्द केले तर हा आकडा २० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे सूत्रांनी म्हटले आहे.

जागा परिसर जागेचा आकार सध्याचे या निर्णयामुळे लीजचा
(चौैमीमध्ये) वार्षिक भाडे मिळणारे वार्षिक भाडे कालावधी
बॉम्बे मर्कंटाइल बँक जुनाबाजार हजार २९४ हजार २९४ ४३ लाख ३२ हजार ३१२ ९०
पीपलको-ऑप बँक टिळकपथ८२२ ८२२ ३० लाख ६२ हजार ४०० ९०
प्रेमचंदसुराणा टिळकपथ००० ३,९०० ११ लाख ६५ हजार १०४ ९०
सारस्वतबँक नागेश्वरवाडी०५३ हजार ५३ २५ लाख ९० हजार ३८० ९९
प्रेसिडेंट,ज्योतीनगर ज्योतीनगर१०० हजार ६६० लाख ८९९ ९९
देशमुखनगरसंस्था दशमेशनगर१२४.७ हजार ८५९० लाख ४३ हजार ८४२ ९९
सतीशप्रकाश लाहोट उस्मानपुरा१०२ हजार १०३ लाख ८२ हजार ३७६ ३०
रूपचंदगिरधारीलाल उस्मानपुरा१०२ हजार १०३ लाख ८२ हजार ३७६ ३०
चैतन्यगृह निर्माण गारखेडा२१३८ १०० १६ लाख ४१ हजार ९८४ ३०
कुशिनारागृहनिर्माण जसवंतपुरा२५७५ १० हजार २३४ १४ लाख ५२ हजार ३०० ९९
समर्थमहिला मंडळ समर्थनगर२५ १०० ३४ हजार ८०० ३०
त्रिवेणीको.हौ. सो कटकटगेट३५२२ १०० २९ लाख ५८ हजार ४८० ९९
मराठासेवा मंडळ टिळकपथ३७२ ४०० १,५५,३३,४७२ ९९
बाईसाहेबप्रयागधाम गोविंदनगर७९९.५० १०० १० लाख हजार ३७६ ३०
विवेकानंदकॉलेज समर्थनगर४४३४.७० हजार ६६० १,९,९,३६८ नाही
शिवाईट्रस्ट औरंगपुरानाला १२२० २,३४,२४० लाख ६७ हजार १६ ३०
एमएसईबीपन्नालालनगर५५२५ लाख हजार ६० लाख ३३ हजार ३०० नाही
औषधीभवन दलालवाडी६८४ ९०० २६ लाख १८ हजार ३५२ ९९
सर्व्हेक्रमांक ५४ क्रांतीचौक आकार नाही १२ हजार ३४८ ४२ लाख २४ हजार २२८ ००
---------------

बातम्या आणखी आहेत...