आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 35 Lakh Rupee Cheated Drugs Trader By Mumbai Gang

दाम दसपटीचे आमिष; ३५ लाखांना गंडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनिवासी भारतीयांच्या फंडातून रिझर्व्ह बँकेकडे येणाऱ्या फंडातील रक्कम काढण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या कमिशनमध्ये गुंतवणूक केल्यास सातच महिन्यांत दहापट परतावा मिळतो, असे आमिष दाखवून शहरातील एका औषधी व्यापाऱ्याला मुंबईतील टोळीने ३५ लाख रुपयांना गंडवले. अभिजित अरुण कुलकर्णी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ऑगस्ट २०१३ रोजी त्यांनी ही गुंतवणूक केली होती. अडीच वर्षांनंतर साडेतीन कोटी तर सोडाच मूळ ३५ लाख रुपयेही त्यांना मिळाले नाहीत. पोलिसांनी विश्वनाथ अवचट, अशोक शिवराम जंगम या दोघांना अटक केली असून महिला अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

असे दाखवले आमिष
मुंबईयेथील एका महिलेच्या संस्थेच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एनआरआय रिलीज फंडाचे पैसे येतात. त्या फंडासाठी गुंतवणूक केल्यास सातच महिन्यांत दाम दहापट होते, असे सांगितले होते. आरोपींनी खरेदी केलेली वाहने, रोख दीड लाख असा ४० लाखांचा ऐवज जप्त केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, फौजदार सुभाष खंडागळे, विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, विठ्ठल फरताळे, दत्तू गायकवाड, मनोज उईक यांनी ही कारवाई केली.