आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचा साठा ३५ टक्के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मराठवाड्यातील साडेतीनशे गावांची तहान भागवण्या-या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा यंदाच्या पावसाळ्यात वरील धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर तीन वर्षांत प्रथम ४५ टक्क्यांवर पोहोचला होती. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने या साठ्यात झपाट्याने घट होत आहे.
सध्या प्रतिदिन ०.१५ टक्क्यांनी घट होत असून यामुळे साठा ३५ टक्क्यांवर आला आहे. त्यात वरील धरणातून समन्यायी पाणीवाटपाचा प्रश्न सुटला नसल्याने जायकवाडीचा पाणीसाठा उन्हाळ्यापूर्वीच मृत येणार असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे तालुक्यात धरण असूनही इतर मध्यम व लघु प्रकल्प कोरडे पडल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणातून पाणी सोडावे यासाठी मोठे आंदोलन उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

तिढा सुटणे आवश्यक
जायकवाडीच्या पाण्यावर मराठवाड्याची तहान भागते. सध्या झापाट्याने साठा कमी होत असल्याने उन्हाळ्यात पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. समन्यायी पाणीवाटपाचा तिढा सुटणे आवश्यक आहे.
प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

पाण्याचे नियोजन ठरलेले असून सध्या िहवाळा असला तरी बाष्पीभवन होण्याचे प्रमाण उन्हाळ्याप्रमाणे सुरू आहे. सिंचन व इतर पाणीपुरवठा योजनांमुळे पाण्याचा वापर वाढला आहे.
संजय भर्गोदेव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग