आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासूर स्टेशनला ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - येथील गणपती मंदिराच्या बाजूला मोकळ्या जागेत असलेल्या मोबाइल टाॅवरजवळ मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळू किसन पवार (३५, रा. गणपती मंदिर परिसर) असे मृताचे नाव आहे. हा खून आहे की आत्महत्या, या दिशेने शिल्लेगाव ठाण्याचे पोलिस तपास करत आहेत.

आचाऱ्याचे काम करत असलेला बाळू पवार याचा जळालेला मृतदेह चंपालाल मुथा यांच्या मोकळ्या जागेत प्रात:विधीसाठी जाणाऱ्या काहींनी पाहिला. त्यानंतर हा खून झाल्याच्या चर्चा सर्वत्र पसरली. तेव्हा उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी पोलिसांना ही यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, श्वानपथकातील फौजदार एम. पी. घुगे, प्रकाश मिसाळ, सीताराम चव्हाण, ठसेतज्ज्ञ एपीआय जी. एस. दुतोंडे, एस. बी. भावसार यांनीही भेट देऊन पाहणी केली.
पथकाला पाचारण
श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असता श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या मृताच्या घरात जाऊन परत मृतदेहापर्यंत माग काढला. हा खून आहे की आत्महत्या, या दिशेने तपास सुरू केला आहे.
बातम्या आणखी आहेत...