आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत पोहोचले ३७ दलघमी पाणी, दोन टीएमसी आणखी पाणीसाठा वाढेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी अखेर मंगळवारी संध्याकाळी जायकवाडीत पोहोचले. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात ३७.३९ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा ५५४ दलघमी इतका झाला आहे. नागमठाणमधून बुधवारी रात्री आठ वाजता २७ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडीत येत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत जायकवाडीत आणखी दोन टीएमसी पाण्याची भर पडण्याचा अंदाज आहे.

गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी जायकवाडीत झेपावले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जायकवाडीच्या पाणीसाठ्यात तब्बल १.३२ टीएमसी पाण्याची आवक आली आहे. आत्तापर्यंत जायकवाडी धरणात ८८.६५ दलघमी (३.१३ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे.
नाशिक परिसरात पावसाचा ओघ कमी झाल्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून येणारा पाण्याचा ओघ कमी झाला आहे. बुधवारी संध्याकाळी १८४०३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नागमठाणमधून दुपारी चार वाजता ३३४४० क्युसेकने पाणी येत होते. त्यानंतर रात्री आठ वाजता २७५०० क्युसेक पाण्याचा ओघ येत आहे. नागमठाण येथून जायकवाडीत पाणी येण्यासाठी साधारण ते १० तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आणखी दोन टीएमसीने पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यात असून आणखी १८४ दलघमी पाणी आल्यास जायकवाडी लाइव्ह स्टोअरेजमध्ये येऊ शकेल.

दुधनात साडेचार दलघमी पाणी
दुधना धरणात पाण्याची आवक वाढत असून बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४.६० दलघमी पाण्याची आवक आली आहे. आत्तापर्यंत दुधना धरणात २९ दलघमी पाणी अाले आहे. दुधनामध्ये एकूण पाणीसाठा १४१ दलघमी असून यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ३८ इतका आहे. तर येलदरी धरणात २४ तासांत २.१४ दलघमी पाण्याची आवक आली आहे.
बातम्या आणखी आहेत...