आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत 399 बालके कुपोषित, जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या हजार 158 वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या आणि मराठवाड्याच्या राजधानीचे शहर असलेल्या औरंगाबादेतच ३९९ बालके तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित आढळून आली आहेत. जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा हा आकडा हजार १५८ वर गेल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. 

गर्भवती ते बाळंतपण, ०.६ ते वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी पोषण आहार योजनेवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. प्रत्येक तालुक्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांवर या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. स्थानिक बचत गटांमार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. मात्र, पोषण आहाराची नाममात्र रक्कम, गरजूंना वेळेवर मिळणारी मदत आणि जनजागृतीचा अभाव यामुळे कुपोषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्ह्यातील ०.५ वयोगटातील लाख २८ हजार ७६९ बालकांचे वजन केले. त्यापैकी लाख १० हजार ८२८ साधारण श्रेणीची बालके, १४ हजार ३६७ मध्यम आणि हजार १५८ तीव्र कमी वजनाची बालके आढळली. त्यात शहर भाग मध्ये ३९९ कुपोषित बालकांचा समावेश आहे, तर २३८० मध्यम कमी वजनाची बालके आढळली. 

उद्दिष्टांना हरताळ...
 मार्च२०१६ मध्ये जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या हजार ३० होती. ऑगस्टमध्ये त्यात ५७६ कुपोषित बालकांची वाढ होऊन हजार ६०६ वर जाऊन पोहोचली. जानेवारी २०१७ मध्ये ३०६१ आणि जून २०१७ मध्ये हजार १५८ कुपोषित बालके आढळली आहेत. १४ प्रकल्प, हजार २५६ अंगणवाड्या, जिल्हा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पोषण आहार, लसीकरण, विविध तपासण्यांची केल्या जात असल्या तरीही कुपोषित बालकांची संख्या कमी होताना दिसत नाही. 

दीड टक्क्यापेक्षा कमी प्रमाण...
जिल्ह्यातएकूण बालकांचा विचार केला असता, तीव्र कमी वजनाच्या मुलांची टक्केवारी दीड टक्क्यापेक्षा कमी आहे. निसर्गत:च जन्मजात जन्मानंतर आजारी असलेल्या मुलांचा यात समावेश आहे. प्रकल्पांतर्गत सर्व सेवा पुरवल्या जातात. मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्यांनी पोषण आहारात गैरप्रकार केला आहे, त्या दोषींवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू आहे, असे जि. प. बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. कदम यांनी सांगितले.

नाममात्र तरतूद 
कुपोषितबालकांच्या पोषण आहारावर २५ दिवसांसाठी प्रतिबालक ४. ९२ रुपये तर गरोदर महिलांसाठी अतिरिक्त पोषण आहारावर प्रतिदिन ५.९२ रुपये खर्चाची तरतूद आहे. एवढ्या तुटपुंज्या रकमेत पोषण कसे होणार हा प्रश्नच आहे. 
बातम्या आणखी आहेत...