आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Building Inspectors How Can Work In 20 Lakh Aurangabad ?

20 लाखांच्या औरंगाबोदेत चार इमारत निरीक्षक काम कसे करणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नगरसेवकांनी वारंवार सांगूनही अतिक्रमणे का काढली जात नाहीत, या प्रश्नावर गरमागरम चर्चा सुरू असताना उपायुक्त शिवाजी झनझन यांनी 20 लाखांच्या शहरात फक्त चार इमारत निरीक्षक आहेत, कसे काम करणार, असा उलट प्रश्न करताच स्थायी समिती सभापती आणि सदस्यांचा संताप अनावर झाला. अखेर आठ दिवसांत शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करून दाखवा, असे आदेश सभापती नारायण कुचे यांनी दिले.


आगा खान यांनी कैलासनगर ते एमजीएम रस्त्यावर सर्रास अतिक्रमणे होत असल्याचा विषय आज स्थायी समितीच्या बैठकीत काढला. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी तीव नाराजी व्यक्त केली. त्यावर उपायुक्त शिवाजी झनझन यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी नगररचना विभागाची मदत लागणार असून तसे पत्र दिल्याचे सांगितले. त्यावर जगदीश सिद्ध यांनी मनपाचे इमारत निरीक्षक करतात तरी काय, असा प्रश्न केला. झनझन म्हणाले की, 20 लाखांच्या शहरात फक्त चार इमारत निरीक्षक आहेत, कसे काम करणार? या उत्तरामुळे संतापलेल्या सभापती कुचे यांनी कोणत्या बांधकामावर तुम्ही कारवाई केली ते सांगा, असे म्हणून थातूरमातूर उत्तरे देऊ नका, असे सुनावले. नगरसेवकांनी पत्र देऊन तीन महिने उलटले, पण कारवाई होत नाही. सेव्हन हिल्स उड्डाणपुलाच्या शेजारी चालू असलेल्या राठी आणि अधाने यांच्या बांधकामावर केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न त्यांनी केला.


कुचे म्हणाले की, गोरगरिबांच्या घरावर तुमचा जेसीबी चालतो, पण करोडपतीच्या दारासमोर मनपाचा ट्रॅक्टर पण जात नाही. आठ दिवसांत शहागंज, औरंगाबाद, निराला बाजार, घाटी आदी रस्त्यांवरची अतिक्रमणे काढा. या बैठकीत नगरसेविका फिरदौस फातिमा यांनी रोशन गेट ते आझाद चौक रस्त्याचा तर नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी त्रिमूर्ती ेचौक ते आकाशवाणी या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला होता.


नोटीस एकाला, घर पाडले दुस-याचेच
फकीरवाडी येथे बेकायदा बांधकामाच्या विरोधात गुरुवारी मनपाने केलेल्या पाडापाडीचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेविका प्रीती तोतला यांनी नोटीस एकाच्या नावाने दिली आणि दुस-याच्याच घरावर कारवाई केल्याचा आरोप केल्यावर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कडुबा वाघ व धनराज बुरकुले यांची ही दोन घरे असून त्यांना नोटीस देण्यात आली होती व आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त शिवाजी झनझन म्हणाले. त्यावर तोतला यांनी ती घरे कन्हैयालाल चौधरी व बाबूलाल चौधरी यांच्या नावावर असताना वाघ व बुरकुले यांची घरे का पाडली, असे विचारत पुष्ट्यर्थ कागदपत्रेही सादर केली. समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर सभापती नारायण कुचे यांनी या प्रकरणी तोतला यांनी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले.