आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 G Internet Service Available To Aurangabad From January

औरंगाबादेत जानेवारीत 4-G इंटरनेट सेवा मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रिलायन्सच्या केबल टाकण्यासाठी जागोजागी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांमुळे औरंगाबादकर त्रस्त झाले असले तरी हे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. जानेवारीपासून त्याद्वारे अत्यंत वेगवान फोर-जी इंटरनेट सेवा शहरवासीयांना मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियो इन्फो कम्युनिकेशन कंपनीचे ब्रॉडबँड कनेक्शन याच केबलद्वारे दिले जाईल.
फोर-जी सेवेसाठी शहरात सर्वत्र केबल टाकण्याचे काम रिलायन्सने हाती घेतले आहे. सुविधेमुळे हायस्पीड ब्रॉडबँड कम्युनिकेशन, टेलिफोन, टीव्ही व क्लाऊड सर्व्हिसेसचा लाभ घेता येईल, असे आरजेएलचे औरंगाबाद विभागाचे अभियंता सुनील बुगडे यांनी सांगितले.
रिलायन्स कम्युनिकेशनमधून वेगळे होत. मुकेश यांनी स्वत:ची रिलायन्स जियो इन्फो कम्युनिकेशन ही टेलिकॉम कंपनी सुरू केली आहे. शासनाकडे 21 ऑक्टोबर रोजी त्यांनी 1 हजार 673 कोटी रुपये भरून युनिफाईड टेलीकॉम लायसन्स मिळवले आहे. यामुळे कंपनीला फोर जी सुविधा पुरवणे शक्य होणार उर्वरित . पान 12
आहे. देशभरात 22 विभागात या सुविधेचे एकाच वेळी उद्घाटन करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात उस्मानपुरा, टिव्ही सेंटर, सिडको, औरंगपुरा, मिलकॉर्नर अशा विविध भागात अंडलाइन वायरिंगचे काम पूर्णत्वास आले असल्याचे बुगडे यांनी सांगितले. अशी जलद सुविधा देणारी ही पहिलीच टेलिकॉम कंपनी असेल. ही लाईन टाकण्यासाठी शहरात आतापर्यंत 35 किलोमीटरचे खोदकाम करण्यात आले असून, या खोदकामासाठी कंपनीने मनपाकडे सहा कोटी रुपये भरले आहेत.
दैनंदिन जीवनात मदत
आयटी स्वर्व्हिसेसना याचा फायदा होईल. टीव्हीसह सर्व गोष्टी मोबाइल अँप्सद्वारे करणे शक्य होईल. दैनंदिन जीवनात लोकांना सुविधा फायद्याची ठरेल. परदेशात 4-जी मुळे अनेक सोयी सहजसाध्य झाल्या आहेत. सचिन काटे, संचालक, इन्फोगड सोल्युशन
या सुविधा मिळतील
0 इंटरनेटची स्पीड वाढून अनेक अँप्लिकेशन मोबाइलवर उपलब्ध होतील.
0 टीव्हीदेखील मोबाइलमध्ये सहज पाहता येईल.
0 कंपनीत लागणार्‍या ‘सास’ (सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस ) सुविधा अँक्सेस होतील.
0 जियासोबत करार करून नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याची अनेक मोबाइल कंपन्यांची तयारी सुरू आहे.