आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण समाजातील 10पैकी 4 वरांंना मिळेना वधू, परशुराम सेवा संघातर्फे ‘ब्रह्मगाठ’चे आयोजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ब्राह्मण समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर उपाय शोधण्यासाठी परशुराम सेवा संघाने पुढाकार घेतला असून हमखास विवाह जुळवण्यासाठी ब्रह्मगाठ-योग्य वर हवा या आगळ्यावेगळ्या संमेलनाचे आयोजन केले आहे. पारंपरिक वधू-वर मेळाव्यापेक्षा हे संमेलन वेगळे राहणार अाहे. यात ५० विवाहोत्सुक मुलींकडून अर्ज मागवले जातील. मुलगी अाणि पालकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यास अनुरूप दोन मुले शोधली जातील. संमेलनाच्या दिवशी ही मुले आणि मुलगी एकमेकांशी संवाद साधून लग्न निश्चित करतील. सर्व अपेक्षा आधीच पूर्ण झाल्यामुळे यात १०० टक्के विवाह जुळतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे.

 

ब्राह्मण समाजात मुलींची कमी संख्या झाल्यामुळे मुलींना मागणी वाढलीय. साहजिकच मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्या पूर्ण करू शकल्याने विवाहोत्सुक मुलांचे वय वाढत चालले आहे. सोलमेट या वेबसाइटने केलेल्या सर्वेक्षणानुसार ब्राह्मण समाजात १० पैकी मुलांना विवाह जुळवताना प्रचंड त्रास होत आहे. चांगली नोकरी, कमाई, स्वत:चे घर असतानाही मुलींकडून नापसंती येत आहे. लहान शहरातील १० पैकी मुलींना मुंबई, पुणे, बंगळुरू येथील, तर १० पैकी मुलींना परदेशातील वर हवा आहे. यामुळे चाळिशीच्या वर गेलेल्या मुलांची संख्या वाढत चालल्याचे निरीक्षण या सर्वेक्षणात आहे. शेती, व्यवसाय किंवा भिक्षुकी करणाऱ्या मुलांच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. यामुळे परशुराम सेवा संघ, महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष अनिल शिवाजीराव मुळे यांच्या कल्पनेतून ‘ब्रह्मगाठ-योग्य वर हवा’ हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

 

‘ब्रह्मगाठ-योग्य वर हवा’ प्रक्रियेत परशुराम संघाने विवाहोत्सुक मुलींचे बायोडाटा मागवले आहेत. संघाच्या अर्जात मुलीला आणि तिच्या पालकांच्या अपेक्षा भराव्या लागतात. यात अगदी जात, पोटजात, गोत्र, अपेक्षित पगार, नोकरी, व्यवसाय, घरातील सदस्य आदींची माहिती आहे. संघाकडे मुलांची यादी तयार आहे. आलेल्या अर्जातून एका मुलीसाठी दोन मुलांचे स्थळ शोधले जाईल. संमेलनाच्या दिवशी ही मुले मुलीशी संवाद साधतील. त्यात १०० टक्के लग्ने जुळतील, अशी अपेक्षा संयोजक अनिल मुळे यांनी व्यक्त केली अाहे.

 

पाच वर्षांत समस्या सुटेल
ब्राह्मणसमाजालाभेडसावणाऱ्या विवाहाच्या समस्येवर ब्रह्मगाठ हा उपाय ठरणार आहे. या पद्धतीने सातत्याने संमेलन अायोजित केले तर पुढील वर्षांत विवाहाची समस्या कायमची संपेल.
- अनिल मुळे, अध्यक्ष, परशुराम सेवा संघ

 

बातम्या आणखी आहेत...