आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉक करणार्‍या सहा जणांना भरधाव स्कॉर्पिओने चिरडले, 4 जण जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच स्कॉर्पिओने गाडीने 4 जणांना उडवले. - Divya Marathi
याच स्कॉर्पिओने गाडीने 4 जणांना उडवले.
औरंगाबाद- मॉर्निंग वॉक करणार्‍या सहा जणांना भरधाव स्‍कॉर्पिओने उडविल्याची धक्‍कादायक घटना आज (शनिवारी) सकाळी घडली. जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ 6.30 वाजता ही दुर्घटना घडली आहे. चार जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, स्कॉर्पिओ (MH 27, AC 5282) सहा जणांना जोरदार  धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, ते सर्वजण बाजूच्या खड्ड्यात कोसळले. या खड्ड्यात पाणी होते. यात चौघांचा जागेवर मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

भागीनाथ लिंबाजी गवळी (56), नारायण गंगाराम वाघमारे (65), दगडुजी बालाजी ढवळे (65) आणि अनिल विठ्ठलराव सोनवणे (45) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी एमआयडीसी सिडको ठाण्याचे अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे पोहोचले आहेत. सर्व मृतदेह घाटा हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. जखमींवर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. अपघातातील सर्व मृत हनुमान चौक, चिकलठाणा येथील रहिवासी आहेत. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... दुर्घटनाग्रस्त स्कॉप्रिओचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...