आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूल तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा सोमवारी बुडून मृत्यू झाला. सय्यद जबिउद्दीन कादरी सय्यद युसूफ हुसामुद्दीन कादरी (17), सय्यद जुनैद कादरी सय्यद फैजोद्दीन कादरी (17, बुढीलेन), ओसामा मोहंमद जमिरोद्दीन मोहंमद अमोदी (16, रोहिला गल्ली, सिटी चौक) आणि सय्यद मुस्तकीम सय्यद सलीम (16, अल्तमश कॉलनी, रहीमनगर) अशी मृतांची नावे आहेत. चौघांनीही नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.
दोन दुचाकींवरून सकाळी 6 जण तलावावर गेले. दोघे न पोहताच परतले. तलावावरील सुरक्षा रक्षक भालसिंग कणिसे व कैलास वाणी यांना काठावर दुचाकी व चौघांचे कपडे, चप्पल, बूट आणि मोबाइल आढळले. त्यामुळे अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास जबिउद्दीन, जुनैद व ओसामाचा मृतदेह आढळला. मुस्तकीमचा मृतदेह रात्री उशिरा हाती लागला. बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.