आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Thousand Qusecs Water Released From Darna In Godavari

दारणातून चार हजार क्युसेक्स पाणी गोदावरीत, पुरेसा पाऊस मात्र नाहीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव/ पैठण - दारणा धरणातून चार हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी नांदूर मधमेश्वर बंधा-यातून गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसतानाही गोदावरी प्रथमच वाहती झाली आहे. हे पाणी कोपरगावला रविवारी सायंकाळी पोहोचले, अशी माहिती गोदावरी डाव्या तट कालव्याचे उपअभियंता भास्कर सुरळे यांनी दिली.


या पाण्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या गोदावरी नदीकाठच्या 30 गावांना लाभ होणार असून बहुतांशी गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दारणा धरणाची क्षमता 7.2 टीएमसी आहे. त्यातून 3507 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर धरणात 2219, मुकणे 837, भावली 1216, वालदेवी 492, तर नांदूर मधमेश्वरमध्ये 248 दलघफू पाणीसाठा आहे. पिण्यासाठी गोदावरी उजवा कालवा 450 क्युसेक्सने सुरू असून डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे व आमदार अशोक काळे यांनी दोन्ही कालव्यांवरील 10 हजार हेक्टर क्षेत्रास 7 नंबरवर शेतीच्या पाण्याचे आवर्तन व पीकसमूहास मुदवाढ देण्याची मागणी केली आहे.


वरच्या धरणातून 30 टक्के साठा जायकवाडीत
जलसंपत्ती प्राधिकरणांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या नियमाचा फटका अतितुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खो-याला बसला आहे. वरच्या भागातील धरणातून 30 टक्के पाण्याचा साठा जायकवाडीसाठी सोडावा लागत आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती बेभरवशाची झाली आहे. त्यात प्रशासन प्रक्रियेत न्यायसंस्थेचा होणारा हस्तक्षेप, मराठवाड्यातील जनक्षोभ अशा कात्रीत सरकार सापडले आहे.


नगर, नाशिक धरणांतील पाणीसाठा
०भंडारदरा 46 टक्के
०मुळा धरण 35
०निळवंडे 20
०गंगापूर 35
०दारणा 70
०करंजवन21.22
० गंगापूर41.14
०उजरखेड10.24
०पालखेड25.27
०नांदूर-मधमेश्वर91.05
०भावली86.22
०मुळा22.47