आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट मुखत्यारपत्राद्वारे ४० कोटींची मालमत्ता हडपण्याचा प्रकार उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वडिलोपार्जित जमिनीवर मुलींचे नाव असतानाही भावांनी इतर वारसांना विश्वासात घेऊन बनावट मुखत्यारपत्राद्वारे मुलींची नावे खातेउताऱ्यावरून कमी करून सुमारे ४० कोटींची मिळकत हडपण्याचा प्रकार उघड झाला आहे. पालिकेकडून जादा एफएसआय पदरात पाडून घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरोधातही तक्रार केली असून, न्यायालय आदेशान्वये संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

श्रीमती सरला मौले (रा. ओझर) यांच्या वतीने अॅड. सचिन बच्छाव, अॅड. शशिकांत गायकवाड यांनी न्यायालयात तक्रार अर्ज केला होता. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मयताचे बनावट मृत्युपत्र एफएसआयच्या बेकायदा खरेदीखतान्वये एका बांधकाम व्यावसायिकाने अशोका मार्गावर इमारती विकून कोट्यवधींचा नफा कमविल्याचा आरोप केला आहे. जमिनीचे मूळ मालक मुरलीधर काठे यांचे निधन झाले असून, त्यांना सरला, सुलोचना, लीलाबाई, चांगुनाबाई तसेच यादव, प्रकाश असे वारसदार आहेत. त्यांची नावे उताऱ्यावर येणे अपेक्षित असताना दोघा भावांनी बनावट मृत्युपत्राने मुलींचे हक्क डावलून भावांची नावे अधिकाऱ्यांच्या मदतीने उताऱ्यावर लावली. तक्रारदार सरला मौले यांनी मृत्युपत्र फॉरेन्सिक लॅब येथे पाठवून मृत्युपत्रावरील सह्या अंगठा खोटे असल्याचे सिद्ध केले. याच जमिनीवर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जादा एफएसआयही बिल्डरने मिळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. न्यायाधीश श्रीमती कोळपकर यांनी अर्ज ग्राह्य धरीत बिल्डरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये यादव मुरलीधर काठे, प्रकाश काठे, पुंडलिक बनकर, दत्तू मोरे, रवी महाजन यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...